गुणरत्न सदावर्तेंसोबत त्यांचे पाळीव गाढवही 'बिग बॉस'च्या घरात जाणार?

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले वकिल गुणरत्न सदावर्ते आता 'बिग बॉस'च्या घरात दिसणार आहेत. त्यांच्यासह त्यांचे गाढव देखील येथे दिसणार आहे.  

वनिता कांबळे | Updated: Oct 5, 2024, 11:01 PM IST
 गुणरत्न सदावर्तेंसोबत त्यांचे पाळीव गाढवही 'बिग बॉस'च्या घरात जाणार? title=

Advocate Gunratna Sadavarte :  एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले वकिल गुणरत्न सदावर्ते आता 'बिग बॉस'च्या घरात दिसणार आहेत. गुणरत्न सदावर्तेंसोबत त्यांचे पाळीव गाढवही  'बिग बॉस'च्या घरात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण तशा प्रकारचे फोटो सोशल मिडियावर झाले आहेत. यामुळे गुणरत्न सदावर्ते यांची 'बिग बॉस'च्या घरातील एन्ट्री कशी असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या आधी बिग बॉस हिंदीमध्ये अभिजीत बिचुकले दिसले होते. त्यावेळी अभिजीत बिचुकलेनं सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदी 'बिग बॉस'च्या  18 सिजनची प्रेक्षक आतुरतने वाट पाहत आहेत. 'बिग बॉस 18' व्या पर्वात कोण कोण दिसणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती.  पहिले नाव जाहीर झाले ते गुणरत्न सदावर्ते यांचे. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: या विषयी घोषणा केली आहे. सदावर्ते यांच्या एन्ट्रीचा प्रोमो देखील समोर आला. यात सदावर्तेंची झलक पहायला मिळत आहे. तर, आणखी व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सेटवर एक गाढव दिसत आहे. हे गाढव सदावर्ते यांचे असून ते देखील बिग बॉसच्या घरात जाणार असल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. 

 

सदावर्ते यांनी घरी गाढव पाळलेय

प्राणीप्रेमी घरात मांजर, कुत्रा, पोपट किंवा अगदी लहान प्राणी पाळताना दिसतात. पण गुणरत्न सदावर्ते यांनी चक्क घरात गाढव पाळला आहे. काही दिवसांपूर्वी याची सोशल मिडियावर जोरदार चर्चा रंगली होती. सदावर्ते यांची मुलगी झेन हीला प्राण्यांची आवड आहे. यामुळेच त्यांनी घरी गाढव पाळले आहे. सदावर्ते यांच्या गाढवाचे नाव मॅक्स आहे.  एका मुलाखतीत सदावर्ते यांनी घरी गाढव पाळल्याचे सांगितले होते.  गाढवाचे दुध आरोग्यासाठी फायदेशीर आहे.  पोटातील आजार गाढवाच्या दुधामुळे समूळ नष्ट होतात. मुलांना आजार झाल्यानंतर त्यांना गाढवाचं दूध मिळत नाही.' मी, माझी मुलगी झेनच्या लाडाखातर माळेगावच्या यात्रेतून घेतलं होतं असे स्पष्टीकरण सदावर्ते यांनी दिले होते.