SSR Case : सुशांतचा मृतदेह नेणाऱ्या एम्ब्युलन्स चालकाचा एक खळबळजनक खुलासा

ज्यावेळी सुशांतला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आलं, तेव्हा... 

Updated: Aug 6, 2020, 04:14 PM IST
SSR Case : सुशांतचा मृतदेह नेणाऱ्या एम्ब्युलन्स चालकाचा  एक खळबळजनक खुलासा
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता sushant singg rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणी त्याचा मृतदेह नेणाऱ्या रुग्णवाहिता चालकाबाबतच्याही अनेक चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता एक अतिशय महत्त्वाचा खुलासा त्या चालकाने केल्याचं उघडकीस येत आहे. सुशांतचा मृतदेह नेणाऱ्या या चालकाला गेल्या काही दिवसांपासून धमकी आणि द्वेषपूर्ण असे फोन येत आहेत. 

हिंदुस्तान टाईम्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत विशाल बंदगर आणि त्यांचा भाऊ विविध रुग्णालयांसाठी रुग्णवाहिकेची सेवा पुरवतात. पण, सुशांतच्या प्रकरणापासून त्यांना धमकीचे फोन येऊ लागले. 

अर्वाच्च भाषेत फोनवरुन अनेक व्यक्ती त्यांना धमकावत असून, ज्यावेळी सुशांतला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आलं, तेव्हा त्याचे प्राण गेले नव्हते असं फोन करणारे वारंवार म्हणत असल्याचा आणि असा धक्कादायक दावा करत असल्याची माहिती या रुग्णवाहिका चालकांनी दिली.  

सुशांतला आम्हीच मारल्याचा आरोप ही फोन करणारी मंडळी करत असून, परमेश्वर आपल्याला याची शिक्षा देईल असं फोन करणाऱ्यांकडून धमकावण्यात येत असल्याचा खळबळजनक खुलासा या रुग्णवाहिका चालकांनी केला. येत्या काळात धमक्यांचं हे सत्र थांबलं ऩाही, तर मात्र या रुग्णवाहिका चालकांनी पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

महिन्याभराहून अधिक काळ लोटला तरीही सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुरु असणारा तपास निकाली निघालेला नाही. उलटपक्षी दरदिवशी या प्रकरणाला एक नवं वळण मिळत असून, नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळं हे प्रकरण आणखी चिघळताना दिसत आहे.