अमेय वाघ झळकणार हिंग्लीश वेबसिरीजमध्ये

पाहा कुणासोबत करणार स्क्रीन शेअर 

अमेय वाघ झळकणार हिंग्लीश वेबसिरीजमध्ये  title=

मुंबई : फास्टर फेणे म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला अभिनेता अमेय वाघ आता नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे. सगळीकडेच आता वेब सीरिजची जास्त चर्चा आहे. अशातच अमेय वाघ नवीन वर्षात आपल्याला एका वेगळ्या रुपात दिसणार आहे. 

मराठी नाटकं, सिनेमे आणि टीव्ही मालिकांमधून भेटणारा अमेय आता आपल्याला हिंदी-इंग्रजी अशा वेब सीरिजमधून भेटणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

परवा म्हणालो होतो एक announcement कारायचीये! मी "ASURA" नावाच्या @voot च्या एका Hinglish webseries मध्ये काम करतोय ह्या अप्रतिम नटा बरोबर! हे तर आहेच.... अजून एक मराठी फिल्म येणारे आणि अजून एक वेगळं प्रोजेक्ट आहे ज्यात मी negative role करतोय! आत्ता शूट करतो सगळं आणि २०१९ साली दनादन काढतो बाहेर प्रोजेक्ट्स! Max प्रेम करत रहा... गरज आहे 

A post shared by amey wagh (@ameyzone) on

चॉकलेट बॉय अशी इमेज असलेला अमेय मात्र या वेब सीरिजमध्ये नकारात्मक भूमिका करताना दिसणार असल्याचं त्याने स्वतःच सांगितलं आहे. 

या वेबसीरिजमध्ये अमेय महत्त्वाची भूमिका साकारत आहे. थ्रिलर वेबसीरिजमध्ये काम करण्याचा अमेयचा हा पहिलाच अनुभव आहे. 

हिंदीमधील नावजलेल्या कलाकारांचा समावेश असलेल्या 'असुरा' या वेबसीरिजमध्ये अर्शद वारसी प्रमुख भूमिका साकारत आहे. वेब हे माध्यम अमेयसाठी नवीन नाही. अमेय आणि निपुण ही जोडी ‘भाडिपा’मुळे आधीच वेब फॅन्समध्ये लोकप्रिय आहे. तर आता अमेय एका हिंग्लीश वेबसिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करत आहे.