आम्ही दोघी मालिकेत मधुरा करतेय आदित्यला जिंकण्याचे प्रयत्न

काय होणार पुढे 

आम्ही दोघी मालिकेत मधुरा करतेय आदित्यला जिंकण्याचे प्रयत्न title=

मुंबई : 'नवे पर्व, युवा सर्व' असं म्हणत झी युवा वाहिनीने वैविध्यपूर्ण मालिका सादर करून तमाम प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. 'आम्ही दोघी' ही नवीन मालिका झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन अली आहे. आम्ही दोघीमालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणिस्वच्छंदी आहे. सध्या मालिकेत प्रेक्षक लव्ह ट्रँगल अनुभवत आहेत.

नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की आदित्यने मीराबद्दलच्या भावना व्यक्त केल्यावर मधुराने देखील तिला आदित्य आवडतं असल्याचं सगळ्यांसमोर कबूल केलं. फक्त कबूलच नाही तर तो फक्त तिचाच आहे असं ठणकावूनसगळ्यांना सांगितलं. आदित्य आणि मधुराच्या या बोलण्यामुळे संपूर्ण कुटुंब आश्चर्यचकित झालं आहे. आदित्य आणि मीरा मधुराला वेळ मारून नेण्यासाठी सगळ्यांसमोर आदित्यला तसं बोलावं लागलं असल्याचं सांगतात आणि हेकळल्यापासून मधुरा आदित्यला इम्प्रेस करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

त्यासाठी ती कुठल्याही ठरला जायला मागे पुढे बघत नाहीये. आदित्यचं मन जिंकण्यासाठी मधुरा मीराला त्याच्या नजरेत खाली पडायचा, तिला खोटंठरवण्याचा प्रयत्न करत आहे. आदित्य देखील तिच्या वागण्यातील बदल अनुभवत आहे. मधुरा आदित्यला मीरापासून तोडण्यात यशस्वी होईल का? मधुराच्या नकळत मीरा आणि आदित्य एकत्र येतील का? हे प्रेक्षक आगामी भागात पाहू शकतात.