व्हिडिओ : बीग बींची मुलगी श्वेतासोबत पहिली जाहिरात

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चनसाठी १७ जुलै हा दिवस काहीसा खास आणि भावूक होता.

Updated: Jul 18, 2018, 10:08 AM IST
व्हिडिओ : बीग बींची मुलगी श्वेतासोबत पहिली जाहिरात title=

मुंबई : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चनसाठी १७ जुलै हा दिवस काहीसा खास आणि भावूक होता. अमिताभ बच्चनने हे काही खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. अमिताभ यांनी त्यांच्या एका नव्या जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या जाहिरातीत त्यांची मुलगी श्वेता नंदा पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ही जाहिरात बीग बींसाठी अत्यंत खास आणि हृदयाला स्पर्श करणारी आहे.

व्हिडिओत अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा पहिल्यांदाच अभिनय करणार आहे. श्वेता या जाहिरातीत अत्यंत साध्या लूकमध्ये आहे. वडीलांना आधार देणारी मुलगी जेव्हा वडीलांसोबत बॅंकेत पोहचते. तिथे वडीलांना कोणीतरी धक्का देतं. मग काय होतं पहा...

बीग बींची भावूक पोस्ट

बीग बींची ही जाहिरात त्यांच्या मुलीसोबत आहे. यातून त्यांच्या चाहत्यांना आणि तमाम प्रेक्षकांना एक संदेश मिळणार आहे. मुलीसोबत काम करुन भावूक झालेल्या बीग बीं नी लिहिले की, ''माझ्यासाठी एक भावनात्मक क्षण आहे. ही जाहिरात जितक्या वेळ्या पाहतो तितक्या वेळा माझ्या डोळ्यात पाणी येते. मुली बेस्टच असतात.'' अमिताभ बच्चन आणि श्वेता नंदा या जाहिरातीचे शूटिंग करत होते तेव्हाचा एक फोटो व्हायरल झाला होता. बीग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये या जाहिरातीचा उल्लेखही केला होता. 

श्वेता म्हणते...

या जाहिरातीबद्दल बोलताना श्वेताने लिहिले की, हा कोणताही डेब्यू नसून फक्त एक जाहिरात आहे. आणि मी ही जाहिरात आपल्या वडीलांसोबत थोड वेळ घालवण्यासाठी केली आहे.