अखेर रणबीर-आलियाला सापडला मुहूर्त

रणबीर-आलियाला पहिल्यांदाचं 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या माध्यमातून स्क्रिन शेअर करणार आहे.   

Updated: Feb 6, 2020, 07:07 PM IST
अखेर रणबीर-आलियाला सापडला मुहूर्त

मुंबई : सध्या अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत, एवढचं नाही तर आलिया-रणबीर लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे ती म्हणजे त्यांच्या लग्नाची. पण त्यांच्या लग्नाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. मात्र त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त मात्र ठरला आहे. 

अभिनेता अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट स्टारर 'ब्रम्हास्त्र' या वर्षी चार डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.  
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.  यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रम्हासत्रच्या प्रदर्शनाच्या तारखेवरून पडदा उठवला आहे. 

याच दरम्यान आलिया भट्टने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये आयान मुखर्जी, बिग बी, आलिया आणि रणबीर चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेवर बोलताना दिसत आहे. त्यांच्यामधीन होत असलेली चर्चा आलियाने तिच्या फोनमध्ये रेकोर्ड केली आहे. 

त्यानंतर चित्रपटीच्या प्रदर्शनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब होताच तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 'ब्रम्हास्त्र' चित्रपट यापूर्वी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. 

परंतु काही आर्थिक अडचणींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबवण्यात आली. या चित्रपटात बिग बींसोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूरही झळकणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकही आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.