Jaya Bachchan On Aishwarya Rai Bachchan : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बी-टाऊनच्या पॉवर कपल्सपैकी एक आहेत. ज्याने केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप प्रसिद्धी मिळवली आहे. बीग बी आणि जया यांना श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन ही दोन मुलं आहेत. या दोघांचंही त्यांच्या मुलांसोबत खूप घट्ट नातं आहे. याचा पुरावा अनेकदा त्याच्या फॅमिली फोटोंमध्ये पाहायला मिळतो. एका मुलाखतीत जया यांनी आपला मुलगा अभिषेक आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन यांच्याबद्दल मन मोकळेपणाने बोलली होत्या. जाणून घेवूयात त्यांनी केलेल्या त्या वक्तव्याबद्दल...
श्वेता-जया बच्चन यांच्यातील पोकळी ऐश्वर्याने भरून काढली
खरंतर, 2007 मध्ये जया बच्चन करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये आल्या होत्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्याची एक सुंदर गोष्ट या मुलाखतीमधून शेअर केली होती. यावेळी बोलताना जया जया यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांची मुलगी श्वेता बच्चन हिचं लग्न झालं तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती आणि ऐश्वर्या राय जेव्हा त्यांच्या घरी सून म्हणून आली तेव्हा ती पोकळी तिने भरून काढली. जेव्हा बीग बी ऐश्वर्याला घरात पाहतात तेव्हा ते खूप आनंदी होतात.''
'ऐश्वर्याला घरात पाहून अमिताभ खूप खुश होतात'-जया
यासोबतच पती अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना जया म्हणाल्या की, जेव्हाही ते आपल्या सूनेला ऐश्वर्याला घरी पाहतात तेव्हा अमिताभ खूप खुश होतात. त्यांना तिच्यात श्वेताच दिसते. जेव्हा त्यांना ती घरी दिसते तेव्हा त्यांना तिच्यात श्वेताच घरी येताना दिसते. श्वेताच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ऐश्वर्याने भरून काढली आहे. श्वेता कुटुंबात नाही, किंवा ती घरातून बाहेर गेली आहे आणि ती बच्चन कुटूंबात नाही हे आम्ही कधीच जुळवून घेऊ शकलो नाही. हे खूप अवघड आहे.
यादरम्यान, ऐश्वर्याबद्दल बोलताना जया म्हणाल्या, "ती स्वतः इंडस्ट्रीतील एक मोठी स्टार आहे, तरीही ती तिच्या कुटुंबाला खूप महत्त्व देते आणि ती एक मजबूत महिला आहे." वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ऐश्वर्या राय शेवटची 'पोनियिन सेलवन 2' या चित्रपटात दिसली होती.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.