Amitabh Bachchan: बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan birthday) हे 11 ऑक्टोबरला 80 वर्षांचे होणार आहेत. बिग बी यांच्या आयुष्यात अनेक किस्से आहेत. अमिताभ यांचा आयुष्यातील सर्वात गाजलेला किस्सा म्हणजे त्यांची आणि रेखा यांची लव्ह स्टोरी (Love story)...अनेकांना हेच वाटतं की अमिताभ यांच्या आयुष्यात रेखा (Rekha) हे त्यांचं पहिले प्रेम (first love) होते. पण थांबा या पण एक ट्वीस्ट (Twist) आहे.
अमिताभ बच्चन यांच्या लव्ह लाईफबद्दल बहुतेकांना असं वाटतं की त्यांचं पहिलं प्रेम रेखा होते. पुढे ते जया भादुरी (Jaya Bachchan) यांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले. पण रेखा आणि जया यांच्या आधी अमिताभ बच्चन एका महाराष्ट्रीयन मुलीवर (Maharashtrian woman) मन हरवून बसले होते. एका वृत्तांनुसार, अमिताभ बच्चन यांचे मित्र दिनेश कुमार यांनी दोघांमधील नात्याचा खुलासा केला होता. थिएटरमध्ये एका नाटकादरम्यान दोघांची भेट झाली आणि त्यांचे प्रेम तीन वर्षे टिकले. (amitabh bachchan first love was Maharashtrian woman nmp)
अमिताभ बच्चन बॉलीवूडचे शहेनशाह बनण्याआधीची गोष्ट आहे, जेव्हा ते कोलकात्यात (Kolkata) काम करायचे. याच कंपनीत काम करणाऱ्या एका महाराष्ट्रीयन तरुणीवर अमिताभ बच्चन यांचं प्रेम जुळलं. त्या मुलीचं नाव चंदा असून बिग बींनाही तिच्याशी लग्न करायचं होतं, अशी चर्चा होती. पण त्यांचं जमले नाही आणि अमिताभ बच्चन कोलकात्यातील नोकरी सोडून मुंबईत (Mumbai) आले. पुढे त्या मुलीने बंगाली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न केलं होतं.
जया यांनी अमिताभ बच्चन यांना 1970 मध्ये पुणे (Pune) फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाहिले. तेव्हा जया आधीच स्टार होती आणि अमिताभ स्ट्रगल करत होते. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अमिताभ बच्चन बारीक असल्यामुळे त्यांना इतर लोक काठी म्हणून हिणवायचे. यावरुन जया त्या लोकांशी भांडायची. त्याचवेळी बिग बींनी जया बच्चन यांना पहिल्यांदाच एका मासिकाच्या मुखपृष्ठावर पाहिले. दोघेही एकमेकांना आवडू लागले आणि 'जंजीर'च्या वेळी त्यांच्यातील जवळीक आणखी वाढली.
प्रकाश मेहरा यांच्या 'जंजीर' (Zanjeer )मधला अमिताभचा अँग्री यंग मॅन लूक चांगलाच आवडला होता. चित्रपटाच्या यशानंतर त्याचे सेलिब्रेशन लंडनमध्येच साजरे करायचे हे सर्वांनीच ठरवले होते. हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी विचारले की त्यांच्यासोबत कोण जात आहे. जया यांचं नाव ऐकताच त्यांनी परदेशात जायचं असेल तर आधी लग्न करावे लागेल, असे स्पष्ट केले होते. अशा परिस्थितीत अमिताभ राजी झाले आणि दुसऱ्याच दिवशी दोघांनी लग्न केले. लग्नानंतर दोघेही लंडनला (London) रवाना झाले.