Amitabh Bachchan: पत्नीला मिठी मारुन ढसाढसा रडले बिग बी, Video पाहून तुम्हाला अश्रू अनावर...

Amitabh Bachchan gets emotional:  पत्नी जया बच्चन यांना पाहता क्षणी अमिताभ यांनी त्यांना मिठी मारली आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले. 

Updated: Oct 7, 2022, 10:49 AM IST
Amitabh Bachchan: पत्नीला मिठी मारुन ढसाढसा रडले बिग बी, Video पाहून तुम्हाला अश्रू अनावर...
Amitabh Bachchan gets emotional tears up at seeing wife Jaya son Abhishek nmp

Amitabh Bachchan : हिंदी चित्रपटासृष्टीतीली महानायक (Bollywood megastar) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मोठा चाहत्या वर्ग आहे. बिग बी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पत्नी जया बच्चन यांना पाहता क्षणी अमिताभ यांनी त्यांना मिठी मारली आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले. 

बिग बी यांना नेमकं झालं तरी काय?

झालं असं की, सध्या अमिताभ बच्चन रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) होस्ट करत आहेत. 11 ऑक्टोबर 2022 रोजी अमिताभ बच्चन 80 वर्षांचे (80th birthday) होतील. त्यामुळे केबीसी या शोच्या निर्मात्यांनी त्यांचासाठी खास सरप्राईज प्लॅन केलं. (Amitabh Bachchan gets emotional tears up at seeing wife Jaya son Abhishek nmp)

11 ऑक्टोबर 2022 बिग बी यांच्या वाढदिवशी केबीसीचा भाग खास अमिताभ बच्चन बर्थडे स्पेशल (Amitabh Bachchan Birthday Special) म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवसासाठी शोच्या निर्मात्याने मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याला स्टेजवर बोलवलं हे पाहून बिग बी (Big B) यांना अश्रू अनावर झाले.

पत्नीला मारली मिठी

लेक अभिषेक यावेळी सरप्राईज (Surprise) म्हणून आई जया बच्चन (Jaya Bachchan) यांनाही स्टेजवर बोलवतो. जया बच्चन यांना पाहता क्षणी अमिताभ भावूक होतात आणि त्यांना मिठी मारतात. अमिताभ बच्चन यांसाठी हे सप्रराईज खूप खास असतं. अभिषेक आणि जया बच्चन यांना पाहून शहेनशाह अमिताभ ढसाझसा रडू लागतात.

अमिताभ बच्चन यांचा वाढदिवसाचा हा खास शोचा प्रोमाचा व्हिडीओ (Promo video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral)होतो आहे. तसंच हा शो बच्चन कुटुंबिया चाहत्यांसाठी खूप रंजक असणार आहे यात शंका नाही.