रस्त्यावर चाट खाण्यापासून Hair Cut पर्यंत, Amitabh Bachchan यांच्या नातीचा साधेपणा पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Navya Naveli Nanda नं सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या नातीचा साधेपणा पाहून नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे. 

Updated: Dec 2, 2022, 12:12 PM IST
रस्त्यावर चाट खाण्यापासून Hair Cut पर्यंत, Amitabh Bachchan यांच्या नातीचा साधेपणा पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Navya Naveli Nanda Photos : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. नव्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच नव्यानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून ती भोपालमध्ये फिरत असल्याचे दिसत आहे. 

नव्यानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नव्यानं मध्ये प्रदेशमध्ये असलेल्या भोपाळच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. नव्यानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती या ट्रीपचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. नव्या भोपाळमध्ये रस्त्यावरील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. नव्या किती डाउन-टू-अर्थ आहे हे सगळ्यांनाच ठावूक आहे. नव्या नेहमीच असं काही करते जे प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरतात. दरम्यान, नव्या बऱ्याचवेळा विना मेकअप स्पॉट केली जाते.  (Navya Naveli Nanda Bhopal Trip) 

नव्याचे भोपाळच्या ट्रिपचे फोटो पाहा - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नव्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये भोपाळचं मार्केट दिसत आहे. तर याशिवाय रस्त्यावर असलेल्या स्टॉलवर नव्यानं केस कापल्याचेही दिसले आहे. नव्याच्या मागे असलेली एक स्त्री मागे केसांना काही करत असल्याचे दिसत आहे. तर या फोटोला पाहून काही नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे की नव्याच्या मागे असलेली महिला ही दुसरी कोणी नाही तर तिची आजी जया बच्चन आहे. 

पाहा काय म्हणाले नेटकरी -

नव्याच्या ट्रिपचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकरी तिचं कौतूक करत आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली आहे की 'जेव्हा नव्या अशा लूकमध्ये दिसते तेव्हा ती खूप सुंदर दिसते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'नव्या तू कधीच फेक वाटत नाही, असंच नेहमीच चांगल काम करत रहा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मी आज पर्यंत कोणत्याही स्टारकिडला असं करताना पाहिलं नाही. हा साधेपणा विचित्र कपडे परिधान करणाऱ्या लोकांपेक्षा चांगला आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'जमिनीशी जोडलेले लोक असे असतात.' (amitabh bachchan grand daughter navya naveli nanda trip to bhopal fans praises her simplicity) 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नव्या तिच्या पॉडकास्टमुळे चर्चेत होती. नव्याच्या या पॉडकास्टमध्ये तिची आई श्वेता बच्चन आणि आजी जया बच्चन यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी त्या तिघींनी महिलांच्या समस्यांवर उघडपणे चर्चा केली.