'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील 'खुदाबक्श' बिग बींचा लूक

काय आहे हा लूक 

'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मधील 'खुदाबक्श' बिग बींचा लूक

मुंबई : अमिताभ बच्चन आणि आमीर खानच्या मोस्ट अवेटेड सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'ची रिलीज डेटसमोर आली आहे. आता हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील अमिताभ बच्चन यांचा 'ठग' चा लूक रिलीज झाला आहे. 

या सिनेमाच्या पहिल्याच दिवसापासून सोशल मीडियावर अमिताभ आणि आमिर यांच्या शुटिंगचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आतापर्यंत या दोघांचे अनेक लूक व्हायरल झाले पण कालांतराने हे लूक खोटे असल्याचं समजतं. पण अखेर अमिताभ बच्चन यांचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' मधील लूक व्हायरल झाला आहे. अमिताभ बच्चन 'खुदाबक्श' या कॅरेक्टरमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये बिग बी एका जहाजावर उभे असल्याच दिसत आहे. हे मोशन पोस्टर खूप पसंतीला पडत आहे. या लूकमध्ये बिग बींच्या हातात तलवार, सफेद दाढी - मिशीमध्ये दिसत आहे. 

हा सिनेमा 1839 मध्ये 'कंफेशन्स ऑफ ए ठग'वर आधारित आहे. या सिनेमाच शुटिंग माल्टा आणि राजस्थानमध्ये झालं आहे. हा सिनेमा 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.