आजही नागरिकांच्या स्वातंत्र्यावर प्रश्न का? Amitabh Bachchan यांचे मोठे वक्तव्य

Amitabh Bachchan यांनी नुकत्याच हजेरी लावलेल्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे. 

Updated: Dec 16, 2022, 01:38 PM IST
आजही नागरिकांच्या स्वातंत्र्यावर प्रश्न का? Amitabh Bachchan यांचे मोठे वक्तव्य title=

Amitabh Bachchan Talked About Freedom of Speech : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अमिताभ हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या मत मांडत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान, यावेळी अमिताभ हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत वक्तव्य केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी आज कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी नागरी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयावर विशेष भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना आजही नागरिकांच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केला जातो असे म्हटले आहे. 

मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी 28 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (KIFF) उद्घाटन केल्यानंतर हे वक्तव्य केलं आहे. ब्रिटीश सेन्सॉरशिप, अत्याचारी, जातीयवाद आणि सामाजिक एकता यांच्या विरोधात स्वातंत्र्यपूर्व चित्रपटांवर विस्तृत बोलल्यानंतर, अमिताभ बच्चन म्हणाले, 'मला खात्री आहे की मंचावरील माझे सहकारी मान्य करतील की नागरी स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.' (amitabh bachchan on freedom of speech still questions are raised on civil liberties) 

हेही वाचा : मेहंदी, हळदीचे फोटो एकासोबत आणि लग्न दुसऱ्यासोबतच; 'गोपी बहू'ने चाहत्यांना केलं हैराण!

फक्त अमिताभ बच्चन नाही तर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) नं त्याचा आगामी चित्रपट 'पठाण' (Pathaan) वर सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. काहीही झालं तरी आमच्यासारखे लोक कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहतील. चित्रपटातील शाहरुखचे दीपिका पदुकोणसोबत असलेली इंटिमेच केमिस्ट्री आणि डान्स मूव्ह्ज चर्चेत आहे. दरम्यान, चित्रपटातील एका गाण्यातील दीपिकाच्या भगव्या ऑऊटफिटवरून वाद इतका तापला आहे की, मध्य प्रदेशात या गाण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर नेटकरी हे गाणं बॅन करण्याचा मागणी करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहरुख पुढे म्हणाला, 'एक काळ असा होता जेव्हा आपण भेटू शकत नव्हतो. पण आता जग पूर्वपदावर येऊ लागले आहे. आपण सर्व आनंदी आहोत आणि मी सर्वात आनंदी आहे. मला हे म्हणायला काहीच हरकत नाही की जग काहीही करतं, मी आणि तुम्ही आणि जगातील सर्व सकारात्मक लोक आपल्यासोबत आहेत.'