अमिताभ यांचं 'बच्चन' हे खरं आडनाव नाही; आपल्या नावा मागचा बिग बींनी सांगितला तो मोठा किस्सा

मेगास्टार अमिताभ 'बच्चन कौन बनेगा करोडपती' 13 शोचा प्रत्येक भाग लोकांसाठी वेगळा आणि मनोरंजक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Updated: Oct 19, 2021, 03:29 PM IST
अमिताभ यांचं 'बच्चन' हे खरं आडनाव नाही; आपल्या नावा मागचा बिग बींनी सांगितला तो मोठा किस्सा title=

मुंबई : मेगास्टार अमिताभ 'बच्चन कौन बनेगा करोडपती' 13 शोचा प्रत्येक भाग लोकांसाठी वेगळा आणि मनोरंजक करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमिताभ बच्चन हे शो मध्ये, आलेल्या प्रत्येक स्पर्धकांसोबत मज्जा मस्तीसोबत खूप गप्पा देखील मारतात. ते त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से देखील शेअर करतात. आता अलीकडेच केबीसीच्या मंचावर अमिताभ यांनी आपल्या आडनाव बदलचा किस्सा शेअर केला.

बिग बींनी गेम खेळताना हॉटसीटवर बसलेल्या भाग्यश्रीसोबत देखील अनेक गप्पा मारल्या. बिग बीं यांनी भाग्यश्रीला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तेव्हा तिने त्यांना सांगितले की, ती आणि तिचा नवरा वेगवेगळ्या कास्टचे असल्यामुळे त्यांनी जेव्हा घरच्यांना एकमेकांबद्दल सांगितले तेव्हा दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्या लग्नासाठी नकार दिला. त्यानंतर गेलाच वर्षी भाग्यश्रीच्या घरच्यांनी या दोघांचं लग्न तर करुन दिलं. परंतु त्यानंतर त्यांच्याशी सगळे संबंध तोडले.

ज्यामुळे मग बिग बी यांनी शोमध्ये हात जोडून भाग्यश्रीच्या वडिलांना त्यांच्या लग्नाचा स्वीकार करण्यासाठी सांगितले. त्यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या स्वत:च्या आयुष्याबद्दल देखील काही गोष्टी सांगितल्या. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल.

त्यांनी शोमध्ये खुलासा करत सांगितले की, त्यांचे आई-वडिल देखील वेगवेगळ्या कास्टचे होते.

अमिताभ यांनी सांगितले की, त्यांची आई तेजी बच्चन ही शीख कुटुंबातील आहेत, तर वडील उत्तर प्रदेशातील आहेत. अमिताभ यांना सांगितले की, त्यांच्या आई-वडिलांना लग्नाच्या सुरूवातीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. परंतु नंतर सगळं सुरळीत झालं. त्यांनी पुढे सांगितले की, ही 1942ची गोष्ट आहे. परंतु आता देखील लोकं या गोष्टींवर विश्वास ठेवतात हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं आहे.

त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आडनावाबद्दल खुलासा करत सांगितले की, त्यांच्या वडिलांचे असे म्हणणे होते की, आडनाव नेहमी लोकंची जात आणि धर्म सांगते, ज्यामुळे त्यांनी जेव्हा शाळेत माझं एडमिशन घेतलं, तेव्हा त्यांनी त्यांच्या आडनावा एवजी मला त्यांचे टोपन नाव आडनाव म्हणून दिले. ज्यामुळे मला बच्चन असे आडनाव मिळाले.