KBC 13: अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदाच आला असा 'किस'चा अनुभव

KBC 13: चाहत्याकडून सेटवर लाजीरवाणी प्रकार, अमिताभ म्हणाले माझं लग्न...

Updated: Sep 11, 2021, 05:05 PM IST
KBC 13: अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदाच आला असा 'किस'चा अनुभव title=

मुंबई: टीव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती हा खूप लोकप्रिय शो आहे. घराघरात हा शो पाहिला जातो. काही ठिकाणी फक्त अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी हा शो पाहतात. या शोमध्ये एक अजब प्रकार घडला. चाहत्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक अजब प्रकार केला हा प्रकार पाहून बिग बी अमिताभ बच्चन यांनाही काहीसा धक्का बसला. 

गेल्या मोसमात प्रेक्षक नव्हते आणि सेटवर फक्त स्पर्धक असायचे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी हे मान्य केले आहे की जेव्हा प्रेक्षक असतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते. गुरुवारच्या एपिसोडमध्ये अमिताभ प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलानं लक्ष वेधून घेतलं. या महिलेनं त्यांना फ्लाईंग किस दिलं. त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले की माझं लग्न धोक्यात येईल. 

खरं तर, खेळादरम्यान, जेव्हा स्पर्धक कल्पना दत्ताने 12,50,000 रुपयांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले.तेव्हा ब्रेक दरम्यान एका महिला चाहत्याने बिग बींना फ्लाइंग किस दिलं. त्यावर अमिताभ बच्चन गमतीने म्हणाले, मॅडम बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुमच्या या फ्लाइंग किसमुळे वैवाहिक जीवनात धोका निर्माण होऊ शकतो. 

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या या शैलीने नेहमीच चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्यांच्या या विनोदी आणि हजरजबाबी वृत्तीमुळे कौन बनेगा करोडपती पाहणं चाहते पसंत करतात. त्यांचे चाहतेही खूप आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा शो खूप प्रसिद्ध आहे. सेटवर ही गोष्ट घडल्याने काहीशी परिस्थिती अवघडल्यासारखी झाली होती. मात्र अमिताभ यांना ही हलकाफुलका माहोल केला.