Father’s day 2020 : वडिलांसाठी महानायकाची भावूक पोस्ट

आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो.        

Updated: Jun 21, 2020, 03:59 PM IST
Father’s day 2020 : वडिलांसाठी महानायकाची भावूक पोस्ट

मुंबई : आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आजच्या या स्पर्धेच्या युगात वडील प्रत्येक मुलासाठी आधार असतो. आजच्या युगात प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं. तसचं आजच्या दिवसाचे औचित्य साधत संपूर्ण जग फादर्स डे साजरा करत आहे. त्यात सोशल मीडियाचं आभार मानवं तितकं कमीच. कारण आज सामान्य जनतेपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांनीदेखील त्यांच्या वडिलांचा फोटो शेअर करत फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. वडिलांच्या फोटोसोबतच त्यांनी स्वतःचा देखील फोटो शेअर केला आहे. बिग बींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते दोघे लिखाण काम करत असल्याचे दिसून येत आहे. या फोटोला त्यांनी “हमें पढ़ाओ न… रिश्तों की कोई और किताब…पढ़ी है बाप के चेहरे की… झुर्रियाँ हम ने…!!” असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडत असतात. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियाशिवाय  साता समुद्रापार देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.