मला वाटलं मी कोरोनामुक्त झालो पण... मिलिंद इंगळे सांगतात कोरोनाचा अनुभव

अशी केली कोरोनावर मात 

Updated: Jun 21, 2020, 12:25 PM IST
मला वाटलं मी कोरोनामुक्त झालो पण... मिलिंद इंगळे सांगतात कोरोनाचा अनुभव  title=

मुंबई : 'ये क्या हुँआ, कब हुँआ, कैसा हुँआ..' असं म्हणतं लोकप्रिय गायक, संगीतकार मिलिंद इंगळे यांनी आपला कोरोनाचा अनुभव शेअर केला आहे. मिलिंद इंगळेंनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओत आपण कोरोनामुक्त झालो असं वाटत होतं पण... तसं झालं नाही. मिलिंद इंगळे यांना दोन वेळा रूग्णालयात दाखल व्हावं लागलं. 

मिलिंद इंगळेंचा १२ मे रोजी वाढदिवस होता. त्या एक दिवस अगोदरच मिलिंद इंगळेंना ताप येत होता. रक्ताची तपासणी करून त्यांचा रिपोर्ट कोविड पॉझिटीव्ह आला. सुरूवातीला त्रास होत नसल्यामुळे त्यांनी घरीच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. पण दोन दिवसांनी त्यांची तब्बेत बिघडली. त्यानंतर त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 

My Covid 19 experience

Posted by Milind Ingale on Saturday, June 20, 2020

मिलिंद इंगळे यांनी 'गारवा' या अल्बममधून महाराष्ट्राला खूप आनंद दिला आहे. प्रत्येक पावसात या गाण्यांनी प्रत्येकजण आनंद घेत असतो. मिलिंद इंगळे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला नव्या नव्या गाणी दिली आहेत. कोरोनाच्या या काळात त्यांनी स्वतःसोबत वेळ घालवला आहे. आता काही नवीन गाणी घेऊन मिलिंद इंगळे लवकरच आपल्यासमोर येणार आहेत.