Amitabh Bachchan: बीग बींनी शेअर केल्या जुन्या आठवणी, दिल्या होळीच्या शुभेच्छा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्रामवरुन एक जुना फोटो शेअर केला आहे

Updated: Mar 29, 2021, 02:42 PM IST
Amitabh Bachchan: बीग बींनी शेअर केल्या जुन्या आठवणी, दिल्या होळीच्या शुभेच्छा

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्रामवरुन एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत बीग बींनी त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत . त्यांनी आपल्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ यांच्यासह पत्नी जया आणि मुलगा अभिषेकसुद्धा दिसत आहेत.

1981 साली बनलेल्या 'सिलसिला' चित्रपटात त्यांनी 'रंग बरसे' हे गाणं गायलं होतं, हे गाणं आजही होळीत प्रत्येक घरात प्रत्येत ठिकाणी ऐकायला मिळतं. हा फोटो शेअर करत बीग बींनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये या गाण्याचे बोल लिहिले आहेत. होळीच्या निमित्ताने अमिताभ यांनी ब्लॅक अँन्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी "रंग बरसे भिगे चुनर वाली रंग बरसे .. होली है." अशा आशयांच कॅप्शन दिलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

या फोटोत अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बीग बींच्या खांद्यावर बसलेला दिसत आहे. तसंच पत्नी जया बीग बींच्या मागे उभ्या आहेत. या फोटोमध्ये अमिताभ यांचं कुटुंब पूर्णपणे परिपूर्ण दिसत आहे. ही पोस्ट शेअर केल्यानंतर अमिताभचे चाहते बीग बींना होळीच्या शुभेच्छा देत आहेत.

अमिताभयांच्या या फोटोवर चाहत्यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, "1981 च्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. हे गाणे पूर्वी जितके लोकप्रिय होतं. तितकच आजही हे गाणं तेवढच लोकप्रिय आहे.

"दुसर्‍या चाहत्यानं लिहिलं की, "परफेक्ट फॅमिली." त्याचवेळी एका चाहत्याने अमिताभ यांचं कौतुक करत लिहिलं की, "आजही तुमच्या आवाजात जादू आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा." अमिताभ बच्चन लवकरच 'फेस' चित्रपटात दिसणार आहेत. या सिनेमात रिया चक्रवर्तीही दिसणार आहे."