अमिताभ बच्चन यांच्या एका गोष्टींमुळे प्रसिद्ध अभिनेत्याचा जीव वाचला...

 त्यावेळी ते देखील घाबरले असतील कारण काय होणार हे कोणालाच माहीत नव्हते.

Updated: Mar 13, 2022, 01:10 PM IST
 अमिताभ बच्चन यांच्या एका गोष्टींमुळे प्रसिद्ध अभिनेत्याचा जीव वाचला... title=

मुंबई : अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत केलेले सर्व सिनेमे गाजले. काही जुन्या सिनेमातील त्यांची पात्र आजही तितकीच लोकप्रिय आहेत. अमिताभ बच्चन यांनी दिवंगत अभिनेते अमजद खान यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अमजद खान यांच्या पत्नीने एक जुना किस्सा आता रिवील केला आहे. जेव्हा तिच्या पतीवर शस्त्रक्रिया होणार होती, तेव्हा नक्की काय घडलं होतं याबाबत त्या सविस्तर बोलल्या आहेत. 

अमजद खान यांची पत्नी शेहला खान यांनी एका मुलाखतीत हा जुना किस्सा सांगितला. गोव्याजवळील सावंतवाडी येथे अमजद खान यांचा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यावेळी त्या गरोदर होत्या. अभिनेत्याच्या चेहऱ्याला जखमा झाल्या होत्या आणि गंभीर दुखापत झाली होती. स्टेअरिंग त्यांच्या छातीत घुसले होते, त्यामुळे फुफ्फुसालाही दुखापत झाली होती.

त्यांना नीट श्वासही घेता येत नव्हता आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. पण अमजदला माझी आणि आमच्या बाळाची जन्माची खूप काळजी होती.

शेहला पुढे म्हणाल्या की, सावंतवाडीतील हॉस्पिटलबाहेर लोक जमा झाले होते. ते म्हणत होते गब्बरसिंगला बाहेर काढा. डॉक्टरांनी आम्हाला पणजीला पाठवले, नाहीतर लोकांनी हॉस्पिटल उद्ध्वस्त केले असते.

अमजद यांच्यावर गोव्यात उपचार करायचे होते, तेव्हा अमिताभ यांनी कागदपत्रांवर सही केली होती जेणेकरून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करू शकतील.

त्या  पुढे म्हणाल्या की, अमजद आणि अमितजी यांचे जवळचे नाते होते. त्यावेळी ते देखील घाबरले असतील कारण काय होणार हे कोणालाच माहीत नव्हते.

अमजदने शस्त्रक्रियेचे नाव कागदावर लिहिल्याने त्यांना आश्चर्य वाटले. शस्त्रक्रियेनंतर आम्हाला मुंबईला पाठवण्यात आले. आम्ही तीन महिने नानावटी हॉस्पिटलमध्ये राहिलो. अमिताभ यांनी पुढाकार घेतल्याने ऑपरेशनला सुरुवात झाली.