Amitaabh Bachchan यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्याला चोरीच्या आरोपात अटक

Nagraj Manjule यांच्या 'झुंड' चित्रपटात काम करुनही या अभिनेत्यानं असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

Updated: Nov 25, 2022, 10:23 AM IST
Amitaabh Bachchan यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्याला चोरीच्या आरोपात अटक  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'झुंड' (Jhund)या चित्रपटातील बाबू छेत्रीची भूमिका साकारणाऱ्या 18 वर्षांच्या प्रियांशू क्षेत्रीला (Priyanshu Chettri) पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. तो नागपूरच्या मेकसोबाग येथे राहत होता. मानकापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चित्रपटात अमिताभ मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी फुटबॉल खेळायला सांगतात असं दाखवण्यात आले होते. अमिताभ मुलांना चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न करतात.

याआधीही चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रियांशूला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. 'झुंड' हा चित्रपट नागपूरच्या फिजिकल एजुकेशनच्या शिक्षकाच्या जीवनावर आधारित बायोपिक होता. त्यांचे नाव वियान बारसे होते. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात बाबूच्या भूमिकेसाठी प्रियांशूची निवड झाली होती. यापूर्वी प्रियांशूला ड्रग्जचं व्यसन होतं आणि तो मालगाडीतून कोळसा चोरायचा. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो सेलिब्रिटी झाला. चित्रपटात दिसल्यानंतरही प्रियांशूनं स्वत:मध्ये सुधारणा केली नाही आणि पुन्हा गुन्हेगारीत अडकला.

हेही वाचा : 'आवड होती म्हणून आणि आता वेड आहे म्हणून...', Genelia Deshmukh च्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर आला समोर

मानकापूर येथील आंबेडकर हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे प्रदीप बरबाजी मोंडवे यांच्या घरात चोरीची घटना घडली. प्रदीप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांच्या घरातून पाच लाख रुपयांचा सामान चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी प्रियांशू नावाच्या अल्पवयीन मुलाला अटक केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून 25 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यानंतर उत्तर नागपुरातूनही पोलिसांनी चोरीचा सामान जप्त केला.

प्रियांशु हा एक चांगला फुटबॉलपटू देखील आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या संघानं फुटबॉलचा सामनाही जिंकला होता. फुटबॉल खेळल्यामुळे त्याची या चित्रपटासाठी निवड झाली होती. चुकीच्या संगतीत पडून त्याला अंमली पदार्थांचे व्यसन लागले. त्यासाठी त्यानं चोरीही सुरू केली. प्रियांशूचे वडील रोजंदारी मजूर आहेत. त्याला तीन मोठ्या बहिणीही आहेत. पोलिसांनी रेल्वे लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून त्यात प्रियांशूचाही सहभाग होता आणि त्याच्याकडे 14 मोबाईल सापडले होते.