उकाड्याने बिग बीही त्रस्त; केलं 'हे' मार्मिक ट्विट

बिग बींनी केलं मजेशीर ट्विट

Updated: Jun 2, 2019, 08:22 PM IST
उकाड्याने बिग बीही त्रस्त; केलं 'हे' मार्मिक ट्विट title=

मुंबई : यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाच्या पाऱ्याने अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. सर्वच जण या भीषण उन्हाने त्रस्त झाले असताना बिग बी अमिताभ बच्चनही कडाक्याच्या उन्हाने हैराण आहेत. या गर्मीवर बिग बींनी एक मजेशीर ट्विट केलं आहे. सोशल मीडियावर हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे. 

'गर्मीमुळे परिस्थिती इतकी खराब आहे की, वाचताना तजुरबा लिहिलेलंही तरबूजा असं दिसतंय' असं मजेशीर ट्विट त्यांनी केलं आहे. या ट्विटसह त्यांनी एक हसणारा ईमोजीही पोस्ट केला आहे. लिहिलेल्या ट्विटसह त्यांनी स्वत:चा एक अगदी रंगबेरंगी फोटो टाकत ही गमतीशीर पोस्ट शेअर केली आहे. 

बिग बी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. ते अनेकदा वेगवेगळ्या विषयांवर आपल्या प्रतिक्रिया, मतं मांडत असतात. आता या कडक उन्हावर त्यांनी केलेलं विनोदी ट्विट व्हायरल होत आहे. 

अमिताभ बच्चन अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात बिग बींसह आलिया भट्ट, रणबीर कपूरही स्क्रिन शेअर करणार आहे. याशिवाय बिग बी लवकरच तमिळ चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार आहेत. सध्या ते 'उयर्न्ता मणिथन' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून या चित्रपटाचा हिंदी रिमेकही करण्यात येणार आहे.