नवी दिल्ली : देशभरात होत असलेल्या बलात्काराच्या घटनेवर महानायक अमिताभ बच्चन यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. या घटनांवर भाष्य करण हे खूप भीतीदायक असल्याचे अमिताभ यांनी म्हटले. अमिताभ हे 'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ' अभियानाचे ब्रांड अॅम्बेसेडर आहेत. एका कार्यक्रमादरम्यान देशभरात सुरू असलेल्या बलात्काराच्या घटनांवर त्यांनी भाष्य केले. यावेळी अमिताभ यांच्यासोबत ऋषी कपूर उपस्थित होते. जम्मूतील कठुआमध्ये जानेवारीत आठ वर्षाच्या बालिकेवर गॅंगरेप करुन तिची हत्या करण्यात आली. बॉलीवुड कलाकारांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली. अमिताभ यांना जेव्हा यावर प्रतिक्रीया विचारली असता, अशा घटनांवर भाष्य करताना वाईट वाटतं. हे खूप भीतीदायक आहे.
Even discussing this issue feels disgusting, don't bring up this issue. It is terrible to even talk about it: Actor Amitabh Bacchan on being asked about his views on rapes in the country as an ambassador for 'Beti Bachao-Beti Padhao' pic.twitter.com/tDp1zh2QEB
— ANI (@ANI) April 19, 2018
असे प्रश्न मला विचारले जाऊ नये अशी नम्र विनंतीही त्यांनी यावेळी केली.