जया बच्चन यांना बिग बींची एक गोष्ट बिलकूल आवडत नाही, ज्यामुळे....

अशी कोणती गोष्ट जी बिग बींना आवडते पण जया यांना नाही?

Updated: Dec 4, 2021, 09:53 AM IST
जया बच्चन यांना बिग बींची एक गोष्ट बिलकूल आवडत नाही, ज्यामुळे....

मुंबई : सध्या सर्वत्र महानायक अमिताभ बच्चन यांच्या 'कोन बनेगा करोडपती' शोच्या एक हजाराव्या एपिसोडची चर्चा रंगली आहे. बिग बींच्या आयुष्यातील खास क्षणी हॉट सीटवर त्यांच्यासोबत त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा उपस्थित होती. या एपिसोडने सर्वांचं लक्ष वधून घेतलं. महत्त्वाचं म्हणजे यावेळी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बिग बींच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन देखील उपस्थित होत्या. 

हॉट सीटवर बसलेली श्वेता बच्चन म्हणते की, घरातील सर्वात महत्त्वाचे सदस्यही या क्षणी सामील होणार आहेत. त्यानंतर जया बच्चन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शोमध्ये सहभागी झाल्या. यावेळी जया यांनी अमिताभ बच्चन यांच्या ड्रेसिंगची खिल्ली उडवली.

नव्याने तिच्या आजोबांचे कौतुक केले. नव्या म्हणाली, 'मी आज सांगणार होती की तुम्ही खूप छान दिसत आहात, नाहीतर आम्ही तुला घरात नाईट सूटमध्ये पाहतो. तुम्हाला सूटमध्ये पाहून आनंद झाला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ...

नव्या आणि श्वेता म्हणाल्या, जेव्हाही आम्ही 'कौन बनेगा करोडपती' घरी बसून पाहतो तेव्हा अनेकदा तुमच्या स्टाईलबद्दल चर्चा होते. बहुतेक कमेंट्स आई करतात. नव्या म्हणते- 'असे काही रंग आहेत जे आजीला तुमच्यावर चांगले दिसत नाहीत, तेव्हा त्या म्हणतात, तुम्ही आज चांगले दिसत नाही.' 

यावर अमिताभ बच्चन जया बच्चन यांना विचारतात- 'काय बोलताय जया?' यावर जया म्हणतात- 'मी तुम्हाला हे सांगितले आहे. एक मरून आणि ब्राऊन घालता... काही रंग तुमच्यावर चांगले दिसत नाही...' हे ऐकून सगळे हसायला लागतात.