'खाइके पान बनारस वाला..' गाण्यात बीग बी यांनी केली होती अभिषेकची नक्कल

दिग्दर्शक चंद्रा बरोट आणि निर्माते नरिमन इराणी यांच्या 'डॉन' चित्रपटाच्या रिलीजला नुकतीच 43 वर्ष झाली आहेत. 

Updated: May 16, 2021, 06:18 PM IST
'खाइके पान बनारस वाला..' गाण्यात बीग बी यांनी केली होती अभिषेकची नक्कल   title=

मुंबई : दिग्दर्शक चंद्रा बरोट आणि निर्माते नरिमन इराणी यांच्या 'डॉन' चित्रपटाच्या रिलीजला नुकतीच 43 वर्ष झाली आहेत. हा चित्रपट 12 मे 1978 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण, कमल कपूर, मॅक मोहन, एमबी शेट्टी, ओम शिवपुरी, इफ्तेखार यांच्या मुख्य भूमिका होत्या. यावेळी हा चित्रपट केवळ 7 लाख रुपयांत तयार करण्यात आला होता आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 7 कोटी रुपये कमावले.

चित्रपटाला 43 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या सिनेमातील एक मजेदार किस्सा सांगाणार आहोत. हा किस्सा 'खाईके पान बनारस वाला' गाण्याशी संबंधित आहे... चित्रपट पूर्ण झाल्यानंतर हे गाणं त्या सिनेमाला जोडलं गेलं होतं. हे फारच कमी लोकांना माहिती आहे.

मुलगा अभिषेक बच्चन कडून 'खाइके बनारस वाला ..' या सुपरहिट गाण्याची हुक स्टेप मिळाली. मुलगा अभिषेकला एका गाण्यांवर नाचताना पाहून अमिताभ यांना त्याची स्टाईल इतकी आवडली की त्यांनी त्याची एक स्टेप्स कॉपी केली. हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा अभिषेक अवघ्या 2 वर्षाचा होता.

हे गाणं देव आनंद यांच्या चित्रपटासाठी लिहिलं गेले होते
डॉन चित्रपटाचं शूट संपल्यावर त्यातील 'खाकै पान बनारस वाला..' हे गाणे जोडलं गेलं होतं, पूर्वी हे गाणं देव आनंद यांच्या चित्रपटाचं बनारसी बाबू यांचं होतं, मात्र देव आनंद यांनी हे गाणं चित्रपटातून काढून टाकलं. डॉन चित्रपटाचं शूट संपल्यानंतर दिग्दर्शकांनी त्याचा प्रीमियर केला, जिथे सगळे मोठे स्टार आले होते.

मनोज कुमार यांनी दिला सल्ला
मनोज कुमार यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर दिग्दर्शकाला सल्ला दिला की, जर धावपळीच्या सीननंतर एखादं गाणं ठेवलं तर प्रेक्षकांना थोडासा रिलॅक्स मिळेल. मनोज कुमार यांच्या सल्ल्यानंतर चित्रपटाचं पुन्हा एकदा एडिटींग करण्यात आलं आणि हे गाणं या सिनेमाला जोडलं गेलं, जे गाणं सुपरहिट झालं.

अमिताभ यांना 30-40 पान खावी लागली
डॉनच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन 2-3 चित्रपटांचं शूटिंग करत होते आणि त्यावेळी त्यांच्या पायावर फोड आले होते, हे गाणं शूट करण्यासाठी ते चायना क्रीकहून मेहबूब स्टुडिओमध्ये आले होते, त्यांना हे गाण्यात अनवाणी पायाने डान्स करायचा होता. पण पायाला फोड आल्यामुळे त्यांचं चालणंही कठीण झालं होतं.

अशा परिस्थितीत, त्यांना इंजेक्शन दिलं गेलं आणि त्यानंतर हे गाणे शूट केलं गेलं, या गाण्याला 4-5 दिवस पूर्ण व्हायला लागले. या गाण्यासाठी अमिताभ यांना 30-40 पान खावे लागले,

डायलॉग, अॅक्शन आणि गाण्यांमुळे ब्लॉकबस्टर
या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्र बरोट यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, डॉनची कथा धर्मेंद्र, जितेंद्र आणि देव आनंद यांना ऐकवण्यात आली होती, मात्र त्यांनी हा सिनेमा नाकारला. डॉनची कथा सलीम-जावेद या जोडीने लिहिली. कल्याणजी-आनंदजी यांनी चित्रपटाला संगीत दिलं आणि गाणी अंजान आणि इंदीवर यांनी लिहिली.