'कोरोना प्रेम आहे...' कोविड पॉझिटीव्ह पतीसाठी शिल्पाने व्यक्त केलं प्रेम

कोरोनाचा हाहाकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

Updated: May 16, 2021, 05:58 PM IST
'कोरोना प्रेम आहे...' कोविड पॉझिटीव्ह पतीसाठी शिल्पाने व्यक्त केलं प्रेम

मुंबई : कोरोनाचा हाहाकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता तर अनेक सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत असतानाचं अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपुर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. काही क्षणापुर्वीचं शिल्पाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.  अशा परिस्थितीत शिल्पाने सोशल मीडियाच्य माध्यामातून पती राज कुंद्रावर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. शिल्पाने पतीसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. 

फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'कोरोना काळात प्रेमाचे क्षण... कोरोना प्रेम आहे.' असं लिहिलं आहे. शिवाय शिल्पाने चाहत्यांना व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आभार देखील मानले आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाल्याची माहिती शिल्पाने सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली. 

शिल्पा सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हणाली, 'गेले 10 दिवस माझ्या कुटुंबासाठी फार त्रासदायक होते. माझ्या  सासू-सासऱ्यांना कोरोना झाला होता. त्यानंतर माझी मुलगी समीशा, मुलगा विवान, राज, माझी आई यांना देखील कोरोना झाला आहे. सर्व जण त्यांच्या खोलीत आयसोलेशनमध्ये आहेत.' असं शिल्पाने सांगितलं.