उसे मेरी आँखों ने…बरसना सिखाया हैं! अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं चर्चेत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. नुकतेच त्यांचे नवीन गाणं आलं आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 9, 2024, 07:07 PM IST
उसे मेरी आँखों ने…बरसना सिखाया हैं! अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं चर्चेत title=

Amruta Fadnavis New song: गायिका अमृता फडणवीस यांचे आणखी एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. सध्या अमृता फडणवीस यांचे हे नवीन गाणं त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्यांच्या या नवीन गाण्याचं नाव 'सावन' आहे. सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांचे हे नवीन गाणं खूपच व्हायरल होत आहे. 

'सावन' या गाण्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. श्रावण महिना सुरु असतानाच त्यांच 'सावन' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांचे 'सावन' हे गाणं हिंदीमध्ये आहे. 'इस बार तेरे शहर में , जो सावन आया है, उसे मेरी आँखों ने…बरसना सिखाया हैं' असे या गाण्याचे शब्द आहेत. याआधी देखील अमृता फडणवीस यांनी झालिमा, दिल को करार आया अशी गाणी लिहिली आहेत. अमृता फडणवीस यांचे 'सावन' हे नवीन गाणं गीतकार राणा सोटल यांनी लिहिले आहे. तर या गाण्याला संगीत रजत नागपाल, केशव त्योहार यांनी दिलं आहे. 

नवीन गाणं चर्चेत 

नुकतेच अमृता फडणवीस यांचे प्रदर्शित झालेले 'सावन' हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या गाण्याला 6 तासांमध्येच 10 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांचा वेगळाच अंदाज बघायला मिळत आहे.  हे गाणं अमृता फडणवीस यांच्या युट्यूब चॅनलवर आहे. सध्या या नवीन गाण्याची सोशल मीडियावर देखील चर्चा होत आहे. अमृता फडणवीस नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. 

पाहा व्हिडीओ