जया बच्चन संसदेत नाराज तर दुसरीकडे ऐश्वार्याची ती प्रतिक्रिया व्हायरल

संसदेत पुन्हा एकदा जया बच्चन संतप्त झाल्या आहेत. संसदेच्या कामकाजादरम्यान त्या आज अस्वस्थ झाल्या होत्या. आज राज्यसभेत त्या सभापती यांच्याशी भिडताना दिसल्या.  

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 9, 2024, 06:32 PM IST
जया बच्चन संसदेत नाराज तर दुसरीकडे ऐश्वार्याची ती प्रतिक्रिया व्हायरल  title=

Jaya Bachchan :  जया बच्चन अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. लोकसभा अधिवेशनामध्ये त्या सतत नाराज असल्याच दिसत आहे. आज पुन्हा एकदा त्या जगदीप धनखड़ यांच्या टोनवर नाराज झाल्याचं दिसलं. बाहेर आल्यानंतरही जया बच्चन जगदीप धनखड़ ज्या टोनमध्ये बोलले ते बरोबर नसल्याचे सांगत होत्या. 

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या ही बच्चन आडनावावर आपली प्रतिक्रिया देत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहणारे लोक ऐश्वर्याच्या स्टाईलचे कौतुक करत आहेत. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ऐश्वर्या रायची विचारसरणीही तिच्या सासूशी जुळते आहे. अशी प्रतिक्रिया लोक तिच्या या व्हायरल व्हिडीओवर देत आहेत. 

ऐश्वर्या रायची प्रतिक्रिया 

ऐश्वर्या रायचा हा व्हायरल व्हिडीओ एका मुलाखतीतून घेण्यात आला आहे. ज्यावेळी ऐश्वर्या राय आणि अभिषेकचे लग्न झाले त्यानंतर झालेल्या संवादात अभिनेत्रीला विचारण्यात आले होती की, 'ऐश्वर्या राय बच्चन' आता तिचे अधिकृत नाव आहे का? या प्रश्नावर ऐश्वर्याने अगदी सहज आणि हसत म्हणाली, अरे देवा! हॅलो अनु, तेच नियमित ऐश्वर्या, त्याच नावाने तू मला आधी ओळखत होतीस. पुन्हा एकदा तिला प्रश्न विचारण्यात आला की, फक्त ऐश्वर्या राय बच्चन की फक्त ऐश्वर्या बच्चन आहे. या प्रश्नावर ऐश्वर्या म्हणाली की, सर्व ठिकाणी ऐश्वर्या राय आहे. पण आता माझे लग्न अभिषेक बच्चनशी झाले आहे. त्यामुळे आता ऐश्वर्या बच्चन असेल. त्यामुळे तुम्हाला जे बरोबर वाटले ते तुम्ही म्हणू शकता. असं तिने यावेळी उत्तर दिले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

यापूर्वी देखील जया बच्चन संसदेत संतप्त

यापूर्वी देखील जया बच्चन यांची सभापतींसोबत भांडणे झाली आहेत. त्यावेळी उपसभापती हरिवंश सदनवरही जया बच्चन संतप्त झाल्या आहेत. त्यावेळी हरिवंश यांनी जया बच्चन यांना त्यांच्या पूर्ण नावाने संबोधले होते. यावर जया बच्चन यांनी आक्षेप व्यक्त करत आजच्या काळात महिलांना त्यांच्या पतीच्या नावाने ओळखले जाते. जणू स्त्रीला स्वत: ची कोणतीही ओळख नसते. यावर हरिवंश यांनी स्पष्टीकरण दिले की, जया यांनी स्वत: नाव कमावले आहे आणि कागदपत्रांमध्ये ज्या नावाची नोंद आहे त्याच नावाने त्यांनी हाक मारली.