PHOTO : 'अमूल'कडून दीपिका-रणवीरला गोड शुभेच्छा

दीपिका-रणवीरच्या प्रेमाचं आणखी सुंदर रुप....

Updated: Nov 15, 2018, 08:11 AM IST
PHOTO : 'अमूल'कडून दीपिका-रणवीरला गोड शुभेच्छा title=

मुंबई : कुटुंब आणि मित्रपरिवार अशा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत  रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा विवाहसोहळा पार पडला. सातासमुद्रापार म्हणजेच इटलीला त्यांनी एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली. 

लेक कोमो येथे पार पडलेल्या या विवाहसोहळ्यानंतर लगेचच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकानेच आपआपल्या परिने या नवविवाहित जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. 

सर्वांच्या लाडक्या जोडीवर होणाऱ्या शुभेच्छांच्या वर्षावात 'अमूल' या दुग्दधजन्य़ पदार्थांचं उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून रणवीर-दीपिकाला देण्यात आलेल्या शुभेच्छा खऱ्या अर्थाने वेगळ्या आणि तितक्याच रंजक ठरल्या. 

नेहमीप्रमाणेच सुरेख कलात्मकतेची जोड देत साकारण्यात आलेल्या 'अमूल'च्या चित्रात रणवीर आणि दीपिकाची प्रतिकृती म्हणून वधू-वराच्या वेशात बाहुला-बाहुली दिसत आहेत. त्याशिवाय Ranveer not singhle anymore! आणि The Deepik-tion of taste! असंही त्या चित्रात, फोटोवर लिहिण्यात आलं आहे. 

शब्दांची रचना आणि दीपिका-रणवीरच्या प्रेमाचं आणखी सुंदर रुपच जणू या शुभेच्छांच्या रुपात सर्वांना पाहायला मिळत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

'अमूल'च्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेला कलाकृतीचा हा उत्तम नजराणा सध्या अनेकांचीच मनं जिंकत आहे. नेटकरीही याची प्रशंसा करताना थकत नाही आहेत, असं एकंदर वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. 

#DeepikaRanveerWedding