मोठा धक्का! अनन्या आणि चंकी पांडेनं गमवली सर्वात जवळची व्यक्ती

अनन्या आणि चंकी पांडे यांच्यावर कोसळला दुखा:चा डोंगर

Updated: Jul 10, 2021, 10:26 PM IST
 मोठा धक्का! अनन्या आणि चंकी पांडेनं गमवली सर्वात जवळची व्यक्ती title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून वेगाने पुढे येत असलेल्या अनन्या पांडेची आजी आणि अभिनेता चंकी पांडेची आई स्नेहलता पांडे यांचं आज मुंबईत निधन झालं आहे. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तिने दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता चंकी पांडे यांची आई आणि अनन्या पांडेची आजी स्नेहलता पांडे यांच्या मृत्यूची पुष्टी करत, सांगितलं की, खार भागात घरी दुपारी 12च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

अनन्या पांडेची आजी स्नेहलता पांडे यांचं निधन झाल्यावर अनन्या पांडे मुंबईतच एका टॉक शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. शूटिंग संपल्यानंतर अनन्या पांडे अंत्यदर्शन घेण्यासाठी तिच्या आजीच्या घरी पोहोचली. त्यानंतर सायंकाळी 5.20 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारसाठी रुग्णवाहिकेद्वारे सांताक्रूझ स्मशानभूमीत नेण्यात आलं.

अनन्या आजी स्नेहलता यांची खूप लाडकी होती. 2019 मध्ये, अनन्याने तिच्या आजीसाठी तिच्या 83व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी एक खास पोस्ट लिहिली होती. या पोस्टच्या माध्यमातून अनन्याने तिच्या आजीचा डान्स व्हिडिओही शेअर केला होता. ज्यात तिची आजी 'ये जवानी है दिवानी' गाण्यावर नाचताना दिसत आहे. यावर्षीही महिला दिनाच्या निमित्ताने अनन्याने आजीबरोबर एक फोटो शेअर केला आणि तिच्या आयुष्यातल्या तिच्या महत्त्वाबद्दल लिहिलं होतं.