Ananya Panday चं शाहरुख खान बद्दल मोठं वक्तव्य !

 शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. 

Updated: Oct 22, 2021, 04:09 PM IST
 Ananya Panday चं शाहरुख खान बद्दल मोठं वक्तव्य !

मुंबई : शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. येथे, किंग खान तुरुंगात आर्यन खानला भेटण्यासाठी गेला असता, एनसीबीची एक टीम त्याच्या मुंबईतील 'मन्नत' या घरावर छापा टाकण्यासाठी आली. यासोबतच एनसीबीने अनन्या पांडेच्या घरावरही छापा टाकला असून काल तिची चौकशी करण्यात आली होती आणि आजही बोलावण्यात आले.

 अनन्या आणि आर्यन खानच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे आता एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. ड्रग्स प्रकरण अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरापर्यंत पोहोचलं आहे, अनन्या पांडे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान यांच्या अगदी जवळ आहेत.

शाहरुखसोबतची मैत्री 

अनन्या पांडेने 2019  मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, 'शाहरुख खान सर माझ्या सर्वात चांगल्या मैत्रिणीचे सुहानाचे वडील आहेत आणि आम्ही एकत्र आयपीएलचे सामने बघायलाही गेलो आहोत.

जब Ananya Panday ने कहा था- 'शाहरुख खान उनके दूसरे पिता की तरह हैं, सुहाना खान से भी है करीबी दोस्ती

आम्ही बर्‍याच विचित्र आणि मजेदार गोष्टी केल्या आहेत आणि त्यांनी आमच्याबरोबर फोटोशूट देखील केले. अनन्या पांडे पुढे सांगते, 'शाहरुख सर नेहमी आम्हाला प्रेरणा देत असत आणि त्यांनी आमचे व्हिडिओ अनेक वेळा घेऊन आम्ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहोत अशी भावना निर्माण केली.

' शाहरुख माझ्या दुसऱ्या वडिलांप्रमाणे आहे'

एका अहवालानुसार, स्टुडंट ऑफ द इयर 2 च्या प्रमोशन दरम्यान अनन्याने खुलासा केला होता की, शाहरुख माझ्या दुसऱ्या वडिलांप्रमाणे आहेत, ते माझ्या चांगल्या मित्राचे वडील आहेत, त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आयपीएल सामन्यांसाठी सामील होतो. अनन्या पांडे म्हणाल्या की, फक्त सुहाना आणि शनाया इंडस्ट्रीतील माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही सर्व काही शेअर करतो.