दिग्दर्शकाच्या धमक्यांपुढे झुकेल अभिनेत्री?, काय असेल तिचा निर्णय?

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधल्या अभिनेत्री अनेकदा मोठी वक्तव्य करत असतात. 

Updated: Oct 22, 2021, 03:56 PM IST
दिग्दर्शकाच्या धमक्यांपुढे झुकेल अभिनेत्री?, काय असेल तिचा निर्णय?

मुंबई : बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधल्या अभिनेत्री अनेकदा मोठे खुलासे करत असतात. दीपिका पदुकोणपासून ते तापसी पन्नूपर्यंत, अनेक बड्या सेलिब्रीटींनी इंडस्ट्रीची काळी बाजू उघड केली आहे. यांना पाहिल्यानंतर, इतर अभिनेत्री देखील बाहेर येत आहेत आणि मोठी रहस्ये उघड करीत आहेत. आता या यादीत अभिनेत्री उर्फी जावेदचं नावंही जोडलं जात आहे. उर्फी जावेद अनेकदा तिच्या ड्रेसेमुळे चर्चेत असते, पण यावेळी तिच्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. या विधानाने उर्फी जावेदने बॉलिवूड इंडस्ट्रीची काळी बाजू उघड केली आहे.

उर्फी जावेदने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, एका वेब सीरिज निर्मात्याने तिला मालिकेत बोल्ड सीन करण्यास सांगितले होते. तिने नकार दिल्यावर निर्मात्याने तिला तुरुंगात पाठवण्याची आणि 50 लाख रुपयांचा गुन्हा दाखल कीरन अशी धमकी दिली.

आपली संघर्ष कहाणी शेअर करताना उर्फी जावेद म्हणाला, 'मी माझ्या कारकिर्दीत खूप संघर्ष केला आहे. मी आजही संघर्ष करत आहे. मी माझ्या किरअरची सुरुवात 3000 रुपये पगारापासून केली. माझ्या मते गोष्टी का होत नाहीत हे सुरुवातीला मला समजू शकलं नाही. मी साईन केलेले शो तीन महिन्यांत बंद झाले. मी 10-12 शोमध्ये काम केलं आहे, मात्र त्यापैकी एकही 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकला नाही.

जेव्हा गोष्टी माझ्यानुसार चालत नव्हत्या, तेव्हा माझ्याकडे फक्त दोन पर्याय होते, एकतर मी मरते किंवा मी संघर्ष करते. माझ्याकडे अजूनही प्लॅन बी नाही. मी या दोन पर्यायांसोबत जीवन जगत आहे. मला वाटत नाही की, मी अभिनेत्री झाली नसती तर मी दुसरं काही करू शकले असते.