बहिणीच्या मेहंदी सोहळ्यात 'हे' काम करताना दिसली अनन्या पांडे, फोटो पाहून नेटकरी भडकले

अनन्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनन्या पांडे तिच्या पालकांसोबत मेहेंदी सोहळ्याला जाताना दिसली होती. सोहेल खानच्या घरी हा मेहंदीचा सोहळा पार पडला. 

Updated: Mar 15, 2023, 05:09 PM IST
बहिणीच्या मेहंदी सोहळ्यात 'हे' काम करताना दिसली अनन्या पांडे, फोटो पाहून नेटकरी भडकले title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. नुकतीच अनन्याने तिच्या चुलत बहिणीच्या मेहंदी समारंभात हजेरी लावली होती. ईथे ती खूप आनंद लुटताना दिसली. मात्र या सोहळ्यात केलेल्या एका कृत्यामूळे ती ट्रोलिंगचीही शिकार झाली. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये ती सिगारेट ओढताना दिसतेय. 

अनन्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, ज्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला गेला होता त्यावरुन तो काढून टाकण्यात आला आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या फोटोा स्क्रिनशॉर्ट घेवून ठेवला होता आणि त्यामुळेच आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि लोकं तिला ट्रोलही करत आहेत.

अनन्या पांडे तिच्या पालकांसोबत मेहेंदी सोहळ्याला जाताना दिसली. या सोहळ्यात अतुल अग्निहोत्री, अलविरा अग्निहोत्री, चंकी पांडे, भावना पांडे, बॉबी देओल आणि त्यांची पत्नी आलिया कश्यप देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपही सहभागी झाली होती. तिच्या बहिणीच्या लग्नात अनन्याने बेबी पिंक स्कर्ट आणि क्रॉप टॉप घातला होता. न्यूड मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. मात्र, त्याच्या ओव्हरफिट बॉडीमुळे तो ट्रोलही झाला होता.

अभिनेत्री अनन्या पांडे आपल्या कुटुंबासह चुलत बहीण अलाना पांडेच्या मेहंदी समारंभात सहभागी झाली होती. त्याचवेळी ती स्मोकिंग करताना कॅमेरात ती स्पॉट झाली. लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या मित्राने हे फोटो क्लिक केले होते. नंतर हा फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आला.

सोहेल खानच्या घरी हा मेहंदीचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सलमान खानची आई सलमा खान आणि हेलनही पोहोचल्या होत्या. या सोहळ्याला सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्रीही उपस्थित होते. अभिनेता बॉबी देओलही पत्नीसोबत पोहोचला होता.