Norway च्या The Quick Style ग्रुपचा मुंबईच्या लोकलमध्ये जबरदस्त डान्स, भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?

Viral Dance Video: नॉर्वेमधील (Norway Dance Group) डान्स ग्रुप 'The Quick Style' यांनी मुंबईच्या लोकलमध्ये (Mumbai Local) भन्नाट डान्स केला आहे. इंस्टाग्रामला (Instagram) त्यांनी व्हिडीओ शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा डान्स ग्रुप सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत असून, सध्या मुंबईत आहेत. या व्हिडीओची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे.   

Updated: Mar 15, 2023, 05:43 PM IST
Norway च्या The Quick Style ग्रुपचा मुंबईच्या लोकलमध्ये जबरदस्त डान्स, भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?  title=

Mumbai Local Train Viral Dance Video: नॉर्वेमधील (Norway Dance Group) डान्स ग्रुप 'The Quick Style' ची सोशल मीडियावर (Social Media) सध्या चांगलीच चर्चा आहे. हा डान्स ग्रुप सध्या जगातील वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत आहे. सध्या हा ग्रुप भारतात असून आपल्या मुंबईत (Mumbai) पोहोचला असून चाहते प्रचंड उत्सुक आहेत. भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत (Virat Kohli) डान्स केल्यानंतर आता या ग्रुपने मुंबईच्या लोकलमध्ये (Mumbai Local) डान्स केला आहे. त्यांच्या डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. 

The Quick Style ग्रुपने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटला मुंबई लोकलमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी 'लेके पेहला पेहला प्यार' गाण्यावर डान्स केल्याचं दिसत आहे. 

व्हिडीओत हा डान्स ग्रुप मुंबई लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात डान्स करताना दिसत आहे. यावेळी मागच्या डब्यातील प्रवासी कुतुहूलाने त्यांचा डान्स पाहत आहेत. ''Our first step in a local train in India #Mumbai,'' अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओ पोस्ट करताना दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Quick Style (@thequickstyle)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 40 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून 4 हजारांपेक्षा अधिक कमेंट्स आल्या आहेत. 

सोशल मीडियावर अनेकांनी त्यांनी लवकर भारतात यावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. दरम्यान काहींनी तुम्हाला मुंबई लोकलमध्ये जागी कशी मिळाली अशी कमेंट केली आहे. तर एका युजरने दिल्ली मेट्रोपासून ते मुंबई लोकलपर्यंत सगळीकडे तुमच्या युनिक स्टाइलची चर्चा आहे असं म्हटलं आहे. 

Boat चे सह-संस्थापक अमन गुप्ता यांनीही व्हिडीओवर कमेंट केली आहे. "Vah. boAt Maja aaya dekh kar," असं ते म्हणाले आहेत. तर आयपीएल संघ मुंबई इंडियन्सने ''Mumbai Local + @thequickstyle = First class experience' अशी कमेंट केली आहे. सडी गल्ली, काला चश्मा आणि बार बार देखो अशा प्रसिद्ध गाण्यांवर डान्स केल्यानंतर हा ग्रुप व्हायरल झाला होता. 

विराट कोहलीसोबतचा व्हिडीओही व्हायरल

The Quick Style ने भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबतही डान्स केला असून, तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विराट कोहली आणि The Quick Style ग्रुपने इन्स्टाग्रामला हा व्हिडीओ शेअर केला असून त्याचीही तुफान चर्चा रंगली आहे. "When Virat and Quick Style" अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Quick Style (@thequickstyle)

अनुष्का शर्मानेही या व्हिडीओवर कमेंट केली असून आगीचे इमोजी टाकले आहेत. या व्हिडीओला 70 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून, 20 लाखांहून अधिक जणांनी लाईक केला आहे.