अभिनेत्याला 6 महिन्यांसाठी Sex न करण्याचा सल्ला, पण नेमकं कारण काय़? चर्चांना उधाण

अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 26, 2022, 12:05 PM IST
अभिनेत्याला 6 महिन्यांसाठी Sex न करण्याचा सल्ला, पण नेमकं कारण काय़? चर्चांना उधाण title=

मुंबई : अभिनेता अँड्र्यू गारफील्डनं 2016 मध्ये method acting मध्ये मार्टिन स्कोर्सेस दिग्दर्शित 'सायलेन्स' चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटात, अँड्र्यूनं एक जेसुइट मिशनरीची भूमिका साकारली होती आणि तो त्याच्या भूमिकेत काही टोकाचे निर्णय घेऊन आला होता. यासाठी अँड्र्यूनं 6 महिन्यासाठी सेक्स आणि वजन कमी होईपर्यंत अन्नाचा त्याग केला होता. 

KBC 14 : रामायणाविषयीच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न दिल्यामुळे, स्पर्धक कोट्यवधींच्या बक्षिसाला मुकला

अँड्र्यू हा स्पायडर-मॅन उर्फ पीटर पार्करच्या 'द अमेझिंग स्पायडर-मॅन' आणि 'द अमेझिंग स्पायडर-मॅन 2' यासोबतच गेल्या वर्षीच्या 'स्पायडर-मॅन: नो वे होम'च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. तो 'द सोशल नेटवर्क, 'हॅकसॉ रिज' आणि 'टिक, टिक... बूम' सारख्या चित्रपटांमध्येही दिसला. सायलेन्स हे मार्टिन स्कॉर्सेसोबतचं त्याचं पिहलं काम आणि समीक्षकांनी त्याला ‘serious actor’ म्हणून ओळख दिली.  

चित्रपटासाठी त्याच्या प्रोसेसबद्दल बोलताना, अँड्र्यूनं अलीकडेच WTF विथ मार्क मॅरॉन पॉडकास्टला सांगितले की, भूमिकेची तयारी करण्यासाठी तो दीर्घकाळापर्यंत अन्न आणि सेक्स संबंधांची लांब राहिला. 'ते खूप छान होतं. त्या वेळी सेक्स आणि वजन कमी होई पर्यंत अन्नापासून लांब राहिल्यामुळे मला काही सुंदर आणि चांगले अनुभव मिळाले.'

आणखी वाचा : दिलीप जोशी नाही तर हा अभिनेता करणार होता जेठालालची भूमिका, नाव ऐकून बसेल धक्का

andrew-garfield-recalls-starving-himself-of-sex-and-food-as-preparation-for-silence

याविषयी बोलताना पुढे अभिनेता म्हणाला, method acting विषयी अनेकांना बरेच गैरसमज होतात. 'लोक अजूनही तशी वागणूक देत आहे आणि याचा अर्थ असा नाही की सेटवर असलेल्या सगळ्यांना वाईट वागणूक द्यायची. याचा अर्थ हा फक्त काल्पनिक परिस्थितीला खरेपणानं जगणं आणि सेटवर असलेल्या सगळ्या क्रु मेम्बर्सना चांगली वागणूक देणं. जेव्हा तुम्हाला त्या भूमिकेतून बाहेर निघायची गरज असते तेव्हा त्यातून बाहेर पडण हे गरजेच आहे.