KBC 14 : रामायणाविषयीच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न दिल्यामुळे, स्पर्धक कोट्यवधींच्या बक्षिसाला मुकला

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये रामायणासंबंधीत हा प्रश्न विचारण्यात आला होता. 

Updated: Aug 26, 2022, 10:24 AM IST
KBC 14 : रामायणाविषयीच्या सोप्या प्रश्नाचं उत्तर न दिल्यामुळे, स्पर्धक कोट्यवधींच्या बक्षिसाला मुकला title=

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे हे 14 वे पर्व सुरु आहे. शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खूप गप्पा मारत खेळ पूर्ण करताना दिसतात. हा शो नेहमीच स्पर्धकांनी सांगितलेल्या त्यांच्या संघर्षाच्या गोष्टींमुळे आणि अमिताभ यांनी सांगितलेल्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. शोच्या नवीन एपिसोडची अमिताभ यांच्यासोबत डॉ. विजय गुप्ता हॉट सीटवर दिसले. 

अमिताभ यांनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या स्पर्धकांसह फास्टेस फिंगर हा खेळ खेळला. यावेळी सगळ्यात लवकर उत्तर देत गुजरातचे डॉक्टर विजय गुप्ता हॉट सीटवर पोहोचतात. अमिताभ यांनी विजय गुप्ता यांच नाव घेताच ते आनंदी झाले आणि ते आनंदानं ओरडू लागले आणि शर्ट काढत ते सेटवर पोहोचले. हे पाहताच अमिताभ यांच्यासोबत ऑडियन्स देखील हसू लागले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

विजय गुप्तानं आनंदाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळ सुरू केला. एक हजार, दोन हजार आणि तीन हजार.... खेळ खेळत असताना विजय गुप्ता 40 हजार रुपयांच्या प्रश्ना पर्यंत पोहोचले. मात्र येथे आल्यानंतर त्यांनी असा गोंधळ केला की ते गेम हरले आणि केवळ 10 हजार रुपये जिंकून त्यांना परतावे लागले.

अमिताभ बच्चन यांनी विजय गुप्ता यांना 40 हजार रुपयांचा प्रश्न विचारला. तो प्रश्न होता, हिंदू पौराणिक कथेनुसार, रावणानं जबरदस्तीनं पुष्पक विमान कोणाकडून हस्तगत केलं?
पर्याय होते A) इंद्र B) कुबेर C) जटायू D) माया  
तर या प्रश्नाचं उत्तर कुबेर होतं. 

या प्रश्नाचे उत्तर विजय यांना माहित नसल्यानं त्यानं आधी 50-50 लाईफलाईन घेतली. पण तरीही ते उत्तर देऊ शकले नाही. यानंतर त्यानी Video Call A Friend लाईफलाइनचा वापर केला. विजय मित्राशी बोलले आणि मित्रानं इंद्र उत्तर दिलं ते विजय यांनी लॉक केलं. पण ते उत्तर चुकीचं निघालं आणि अशा प्रकारे विजय गुप्ता केवळ 10 हजार रुपये जिंकू शकले.