मुंबई : कोणासाठीही आपल्या लाईफ पार्टनरशी वेगळं होणं सोपं नसतं. कारण यानंतर अनेकांना दु:ख होतं. हॉलिवूड अभिनेत्री ऐंजलिना जॉलीने देखील काही दिवसांपूर्वी असाच खुलासा केला आहे. ब्रॅड पिटसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिला खूप वेदना झाल्या. तो बाथरूपच्या शॉवरवर रडत बसायची कारण तिच्या मुलांना हे कळू नये म्हणून.
ब्रॅड पिट आणि जॉली १३ वर्ष रिलेशनशिप होते. जॉली म्हणते की ही माझासाठी खूपच कठीण वेळ होती. मी माझा आईसाठी खूप चिंतीत असायची. मला असं नव्हत वाटत की माझी मुलं देखील यामुळे चिंतेत असावीत. त्यामुळे मी त्यांच्यासमोर रडणं टाळायचे आणि बाथरुमध्ये शॉवरच्या खाली रडायचे. मी त्यांना असं दाखवायची की सर्व ठिक आहे. चिंता करण्यासारखी गोष्ट नाही.
सप्टेंबर २०१६ मध्ये जॉली आणि पिट अचानक वेगळे झाले. त्यानंतर ऐंजलिना जॉलीने कोर्टा आपल्या ६ मुलांची कस्टडी मागितली. तिने कोर्टाला सांगितलं होतं की, तुम्ही ब्रॅड पिटला मुलांशी भेटण्याची परवानगी देऊ शकता.