हा मराठमोळा अभिनेता चढला बोहल्यावर

कुणाशी बांधली लग्नगाठ 

हा मराठमोळा अभिनेता चढला बोहल्यावर  title=

मुंबई : सध्या बी टाऊनमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत.  बी टाऊनमध्ये दीपवीर पाठोपाठ प्रियंका - निकच्या लग्नाची गडबड सुरू झाली. त्यातून कलाकार थोडी विश्रांती घेतात तोच भारतातील बिझनेसमन मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या ईशा अंबानीच्या लग्नाची गडबड सुरू झाली. असं असताना मराठी सिनेसृष्टी तरी मागे कशी राहील? 

मराठी सिनेसृष्टीतील एक जोडी लग्नबंधनात अडकली आहे. कुठेही लग्नाचा गाजावाजा न करता अगदी निवडल लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. अद्याप हे लग्न कुठे झालं याची काहीच माहिती मिळालेली नाही. 

मराठीतील चॉकलेट बॉय अभिनेता अनिकेत विश्वासराव याने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. अनिकेत अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे. अनिकेतने साखरपुड्याची देखील अशीच माहिती दिली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Welcome to the club!!! Congratulations tiger!!! Have a wonderful married life! Loads of love... #astartwithnoend

A post shared by Hemant Dhome (@hemantdhome21) on

स्नेहा चव्हाणने हळदीचे आणि मेंहदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसचे अगदी जवळचे मराठी कलाकार या लग्नाला उपस्थित राहिले त्यांनी देखील अनिकेत - स्नेहाचा शुभेच्छा देत हे फोटो शेअर केले आहेत. 

अनिकेत - स्नेहाचं लग्न हे 9 आणि 10 डिसेंबर रोजी पार पडलं. हे लग्न नेमकं कुठे झालं याची काहीच माहिती नाही ते गुलदस्त्यात ठेवण्यात आलं. अनिकेत आणि स्नेहा 'हृदयात वाजे समथिंग समथिंग' या सिनेमात एकत्र झळकले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sunshine  #day2 #haldi #astartwithnoend @wedding_wings_photography

A post shared by Sneha Chavan (@mesnehachavan) on

स्नेहा आणि अनिकेतचा 5 ऑगस्टला पुण्यातील हिंजवडी येथे साखरपुडा संपन्न झाला. अगदी साधेपद्धतीने हा सोहळा देखील पार पडला होता. या दोघांनी हे अरेंज मॅरेज असल्याचं सांगितल. आम्ही सिनेमांत एकत्र काम करत असलो तरीही आमची फक्त मैत्री होती. पण आमच्या कुटुंबियांनी हे लग्न ठरवलं आहे. अनोळखी व्यक्तीशी लग्न करण्यापेक्षा ओळखीच्या व्यक्तीशी लग्न करू या विचाराने आम्ही दोघं एकत्र आलो आहोत.