या गायकाने सलमान खानला विचारला पुन्हा तोच प्रश्न

या सिंगरचं नवा अल्बम रिलीज 

या गायकाने सलमान खानला विचारला पुन्हा तोच प्रश्न

मुंबई : एक वेळ अशी होती जेव्हा कुटुंब, मित्रपरिवार आणि मीडियाला एकच प्रश्न पडला होता. तो म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार? सुरूवातीला सलमान या प्रश्नावर रागवायचा पण आता त्याने या प्रश्नावर रिअॅक्ट होणं सोडलं आहे. मात्र असं असलं तरीही अजूनही हा प्रश्न बंद झालेला नाही. 

पुन्हा एकदा या प्रश्नाने डोकं वर काढलं आहे. सलमान खानला पुन्हा एकदा या प्रश्नाला सामोरे जावं लागलं आहे. गायक आणि शुभचिंतक म्हणून बादशाहने रॅप गाता गाता सलमान खानला हा प्रश्न विचारला आहे. 

बादशाहने आपल्या गाण्याच्या व्हिडिओ लाँचमध्ये सांगितलं की, तो सलमान आणि शाहरूख खानला अतिशय पसंत करतो. रॅपर बादशाहने सलमानचं कौतुक करताना सांगितलं की, " दिल बड़ा है, जैसे समंदर. कोई न जाने क्या है उसके अंदर... आयुष्यात एवढ्यात सुंदर मुली आहेत, माहित नाही कुणाशी लग्न करणार आहे. 

बादशाहला सलमान - शाहरूख खूप आवडतात 

बादशाहला सलमान - शाहरूखला पसंत करतो. बादशाहचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे तो शब्दात व्यक्त करू शकत नाही. बादशाहने सांगितलं, मी किती प्रेम करतो हे सांगू शकत नाही, कारण ते मला अतिशय आवडतात. 

मला या दोघांना भेटणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं एका आशिर्वादाप्रमाणे वाटते. तसेच शाहरूखचे देखील बादशाहने आभार मानले आणि दिल्लीवरून येऊन स्वतःचा मार्ग स्वतः निवडला.. बॉलिवूडचा किंग, बॉलिवूडचा बाजशाह SRK.

अल्बमचं पहिलं गाणं रिलीज 

बादशाहने आपला अल्बम 'वन'चं पहिलं गाणं रिलीज केलं आहे. 'शी मूव इट लाइक' असे या गाण्याचे बोल असून ते रिलीज झालं आहे. या गाण्यात 'लवरात्रि'या सिनेमातून करिअरला सुरूवात करणारी अभिनेत्री वरीना हुसेन आणि रॅपर बादशाह एकत्र दिसणार आहेत.