अनिकेत विश्वासरावचा 'या' अभिनेत्रीसोबत साखरपुडा

पाहा कोण आहे ही अभिनेत्री 

अनिकेत विश्वासरावचा 'या' अभिनेत्रीसोबत साखरपुडा  title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे लग्नाचा सिझन सुरू झाला अगदी त्याप्रमाणे आता मराठीतही लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. चॉकलेट हिरो अनिकेत विश्वासरावचा नुकताच एका अभिनेत्रीसोबत साखरपुडा पार पडला आहे. 5 ऑगस्ट रोजी हा सोहळा पुण्यातील हिंजवडी परिसरात पार पडला. 'बघतोस काय मुजरा कर', 'पोस्टर गर्ल' यासारख्या सिनेमातून आपण त्याला पाहिलं आहे. अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

Congratssss you two!! @mesnehachavan @aniketvishwasrao #angoothitighthai

A post shared by Manasi Deshpande (@manasi.desh) on

स्नेहा चव्हाण अभिनेता स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क' या सिनेमात झळकली होती. अशी चर्चा आहे की स्नेहा आणि अनिकेत यांच अरेंज मॅरेज आहे. स्नेहाने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये तिचा आणि अनिकेतचा फोटो ठेवला होता. त्यावरून या दोघांचा साखरपुडा झाल्याची चर्चा आहे. अनिकेत आणि स्नेहाने नुकताच एक सिनेमा एकत्र केला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनला आता सुरूवात होत आहे.

अधिकृत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेतची मावशी स्नेहा चव्हाणच्या बिल्डिंगमध्ये राहते. स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी या चांगल्या मैत्रिणी आहेत. यांनी हे लग्न जुळवून आणलं आहे. जानेवारीपासून स्नेहासाठी देखील मुलगा पाहण्याचा कार्यक्रम सुरू होता. अनोळखी मुलाशी लग्न करण्यापेक्षा ओळखीच्या मुलाशी लग्न करणं अधिक चांगल आहे. तसेच अनिकेत आणि स्नेहा एकाच क्षेत्रात काम करतात. म्हणून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जूनमध्ये अनिकेत आणि स्नेहाचं लग्न ठरलं आणि त्यांनी 5 ऑगस्टला साखरपुडा केला आहे. 

स्नेहा मुळची पुण्याची असल्यामुळे हिंजवडीमध्ये साखरपुडा झाला. लग्नासाठी आता अवकाश आहे. कारण आम्हाला दोघांना खूप काम करायचे आहे. आमचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनलाही लवकरच सुरूवात होणार आहे, असे स्नेहा सांगत होती.