रणबीर कपूरने 'एनिमल' चित्रपटासाठी 50 टक्क्यांहून अधिक कमी केली फी? कारण जाणून बसेल धक्का

रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'अॅनिमल' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाला

Updated: Sep 30, 2023, 09:19 PM IST
रणबीर कपूरने 'एनिमल' चित्रपटासाठी 50 टक्क्यांहून अधिक कमी केली फी? कारण जाणून बसेल धक्का title=

Ranbir Kapoor Cut His Fees For Animal : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'अॅनिमल' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाला, जो पाहून लोकं थक्क झाले आहेत. 'अ‍ॅनिमल'च्या टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. तर वृत्त आहे की,  'एनिमल'चं ग्रँण्ड व्हिजन आणि निर्मितीला होणारा विलंब यामुळे चित्रपटाच्या खर्चात लक्षणीय वाढ झाल्याची बातमी येत आहे. अशा परिस्थितीत रणबीर कपूरने याचा फटका स्वत:वर घेतला आहे.

णबीर कपूरने 'एनिमल'साठी 50 टक्के फी कमी केली आहे.
रणबीर कपूरचं सध्याचं मार्केट व्हॅल्यू सुमारे 70 कोटी रुपये आहे. कलाकार त्यांच्या चित्रपट प्रोजेक्टमध्ये खूप गुंतलेला असतो. तो केवळ सिनेमाच्या क्रिएटिव प्रक्रियेतच नाही तर त्याच्या लॉजिस्टिक्स मध्येही सहभागी आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने त्याचा आगामी चित्रपट 'एनिमल' भूषण कुमार आणि संदीप रेड्डी वंगा यांच्या निर्मात्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याच्या एक्टिंग फीमध्ये  50 टक्क्यांहून अधिक कपात केली आहे. रिपोर्टनुसार, रणबीर कपूर एनिमलसाठी 30-35 कोटी रुपये अपफ्रंट फीस चार्ज केली आहे. अभिनेत्याने त्याच्या गँगस्टर-ड्रामाचे प्रोडक्शन वॅल्यूला सुधारण्यासाठी खर्च केली आहे. चित्रपटावर पैसे कमावले तर नफ्यात रणबीर कपूरचा वाटा असेल. ज्याची यावेळी बरीच शक्यता दिसते.

'एनिमल'ची स्टोरी
'अ‍ॅनिमल' हा चित्रपट अंडरवर्ल्डच्या धोकादायक पार्श्‍वभूमीवर आधारित असलेल्या अशांत वडिल-मुलाच्या नात्याभोवती फिरतो. यामुळे चित्रपटाचा हिरो साइकोपॅथ बनतो. या चित्रपटात एका मुलाचे त्याच्या वडिलांवर असलेले प्रेमही दाखवलं आहे. 'एनिमल'चे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलं आहे. या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी अनेक भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.