व्हॅक्सीन घेताना अंकिता लोखंडे, फॅन्स म्हणाले..किती रडशील..किती रडशील...किती नाटकं

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे.

Updated: May 8, 2021, 03:40 PM IST
व्हॅक्सीन घेताना अंकिता लोखंडे, फॅन्स म्हणाले..किती रडशील..किती रडशील...किती नाटकं

मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या तर वाढतचं आहे. पण दुसरीकडे मृतांच्या संख्येने देखील थैमान घातलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. 1 मेपासून 18 ते 44 वर्षांपर्यंत सर्वांसाठी लसीकरण सुरू झालं आहे. अनेक सेलिब्रिटींनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. या यादीमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेचा देखील समावेश आहे. 

अंकिताने लस घेतल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अंकिता लस घेताना दिसत आहे. पण लस घेतना अंकिताने केलेला ड्रामा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंकिताने व्हीडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये प्रत्येकाने लवकर लस घेण्यासाठी आवाहन केलं आहे. 

'मणिकर्णिक : द क्विन ऑफ झांसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावरुन ती बॉयफ्रेंड विकी जैनसोबतचेही अनेक फोटो शेअर करत असते. या फोटोला चाहत्यांची चांगली पसंतीही मिळते.