"तुम्हाला या अभिनयासाठी तडजोड करावी लागेल," अंकिता लोखंडेकडून कास्टिंग काऊच चा खुलासा

अंकिता लोखंडे हिने अलीकडेच  दिलेल्या मुलाखतीत या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा काळा चेहरा उघड केला आहे.

Updated: Mar 24, 2021, 06:12 PM IST
"तुम्हाला या अभिनयासाठी तडजोड करावी लागेल," अंकिता लोखंडेकडून कास्टिंग काऊच चा खुलासा title=

मुंबई : टीव्हीच्या दुनियेत नाव कमावून बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. तिचे व्हिडिओ आणि फोटोंमुळे ती दिवसभर चर्चेत असते. आता अंकिताने इंडस्ट्रीमधील तिचा कास्टिंग काउचचा भयानक अनुभव अनेक वर्षानंतर शेअर केला आहे. अंकिता लोखंडे हिने अलीकडेच बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा काळा चेहरा उघड केला आहे.

तिने या मुलाखतीत सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात एका चित्रपट निर्मात्याने तिला कास्टिंग काउच करण्यासाठी भाग पाडले,  त्यावर अंकिताने त्याला सडेतोड उत्तर दिले .

तेव्हा अंकिता फक्त19-20 वर्षाची

या मुलाखतीत तिच्या संघर्षाबद्दल बोलताना अंकिता लोखंडेने कास्टिंग काउचचा अनुभव उघड केला आहे. ती म्हणाली, "जेव्हा मी फक्त 19-20 वर्षांची होती, तेव्हापासून मी अभिनय क्षेत्रात बर्‍याच ठिकाणी प्रयत्न करत होतो. दरम्यान, मला एका साऊथ चित्रपटासाठी बोलावले गेले.

मी तेथे गेले असता एका माणसाने मला खोलीत बोलावले आणि सांगितले की, आम्हाला  काही विचारायचे आहे. त्यानंतर तो म्हणाले की, तुम्हाला या अभिनयासाठी तडजोड करावी लागेल. यानंतर मी खूप हिंम्मत दाखवून विचारले, "ठीक आहे, मला कसली तडजोड करायची आहे ते सांगा?" मला पार्टीत जायचे आहे की डिनरसाठी?"

धक्कादायक! निर्मात्याबरोबर झोपण्यासाठी सांगितले

यासोबतच पुढे खुलासा करत अंकिताने सांगितले की, तो माणूस एक मोठा अभिनेता आहे. आणि तो तिला म्हणाला की, तुला निर्मात्याबरोबर झोपावे लागेल. अंकिताच्या म्हणण्यानुसार, हे ऐकताच ती रागवली आणि त्या अभिनेत्याला उलट उत्तर दिले की, 'कदाचित तुमच्या निर्मात्याला झोपेण्यासाठी मुलगी पाहिजे आहे, कोणती हुशार मुलगी नाही.'

मुलाखतीत हा किस्सा सांगितल्यानंतर अंकिता म्हणाली, 'मग मी तिथून निघून जात होते, तेव्हा तो अभिनेता मला सॉरी  म्हणाला आणि सांगितले की, मी तुला माझ्या चित्रपटात घेण्याचा प्रयत्न करेन. पण नंतर मीच ते नाकारले आणि त्याला सांगितले की, तुला आता मला चित्रपटात घ्यायचे असले तरीही मी आता काम करणार नाही.