...म्हणून अंकिताच्या बॉयफ्रेंडने घेतला 'हा' निर्णय

सोशल मीडियावर अंकिताच्या बॉयफ्रेंडला देखील ट्रोल करण्यास सुरुवात केली.   

Updated: Jul 9, 2020, 01:06 PM IST
...म्हणून अंकिताच्या बॉयफ्रेंडने घेतला 'हा' निर्णय

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केल्यामुळे कलाविश्वाला त्याचप्रमाणे त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येमागील महत्त्वाचं कारण बॉलिवूडमधील घराणेशाही असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत आहे. सुशांतच्या निधनानंतर त्याच्या खासगी आयुष्याकडे आणि पूर्वाश्रमीची प्रेयसी अर्थात एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिच्याकडेही अनेकांचं लक्ष वेधलं. 

दरम्यान सोशल मीडियावर अंकिताच्या बॉयफ्रेंडला देखील ट्रोल करण्यास सुरुवात केली.  सुशांतच्या आत्महत्येनंतर नेटकऱ्यांनी विकी जैनवर निशाणा साधला आहे. त्यामुळे विकीने त्याचा कमेंट बॉक्स सर्वांसाठी बंद केला असून लिमिटेड पर्याय निवडला आहे. 

विकी जैन एक उद्योगपती आहे. तो सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. पण गेल्या काही दिवसांपासून तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असल्यामुळे त्याने हा मोठा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्रामवर सुशांतच्या अनेक चाहत्यांनी त्याला अंकितासोबत ब्रेकअप करण्यास सांगितले होते. 

तर दुसरऱ्या एका यूजरने ‘तू अंकिता आणि सुशांतच्या मध्ये आला अशील’ असे म्हणत सुनावले आहे. अखेर विकीने सोशल मीडियावर लिमिटेड पर्याय निवडण्याचा मोठा निर्णय  घेतला आहे.