सुशांतच्या अंत्यसंस्काराला न जाण्यामागे अंकिताचं कारण..

सुशांत आणि अंकिता अनेक वर्ष लिव्ह- इनमध्ये होते. 

Updated: Aug 2, 2020, 03:16 PM IST
सुशांतच्या अंत्यसंस्काराला न जाण्यामागे अंकिताचं कारण.. title=

मुंबई : अभिनेता  सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जवळपास दीड महिना होत आला आहे. त्याने आत्महत्या का केली, त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली य सर्व गोष्टींचा उलगडा करण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहे. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक कलाटणी मिळाली आहे. 

केके. सिंह यांनी तक्रार नोंदवल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे राजपूत कुटुंबाला पाठिंबा देत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. टाइम्स नाउशी बोलताना अंकिताने सुशांतच्या अंत्यसंस्काराला का गेली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.

ती म्हणाली, 'सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आणि जुने व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. त्याचे फोटो पाहून मी आणि त्याचे कुटुंबीय फार अस्वस्थ झालो होते. मी सुशांतला अशा स्थितीमध्ये पाहू शकली नसती.' सुशांतच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचं कारण तिने सांगितलं. 

सुशांत डिप्रेशनमध्ये जाऊच शकत नाही तो मनमुरादपणे आयुष्य जगणाऱ्यांपैकी होता.असं देखील ती मुलाखती दरम्यान म्हणाली. दरम्यान सुशांतची आत्महत्यानसून ही हत्या असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. सध्या पोलील याप्रकरणी चौकशी करत आहेत. 

एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी हाती काही लागले नसल्यामुळे ही केस पोलिसांऐवजी CBIकडे सोपवण्यात यावी अशी मागणी होत आहे.