कंगनाच्या घराबाहेर गोळीबार

मनाली येथील राहत्या घरी काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला.  

Updated: Aug 1, 2020, 09:40 PM IST
कंगनाच्या घराबाहेर गोळीबार

मुंबई : नेहमी वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौतच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे. मनाली येथील राहत्या घरी काही अज्ञात लोकांनी गोळीबार केल्यांचं सांगितलं जात आहे. प्रत्येक वेळेस आपले परखड मत आणि वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत असणारी कंगना आज एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या घरावर गोळीबार झाल्या प्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत. 

एका मुलाखती दरम्यान तिने या घटनेबाबत माहिती दिली. 'मी रात्री माझ्या रूममध्ये झोपली होती. तेव्हा जवळपास ११.३०च्या दरम्यान मला फटाक्यांसारखा आवाज आला. सुरवातीला फटाक्यांचा आवाज आहे असं समजून मी या घटनेकडे दुर्लक्ष केलं. पण पुन्हा ८ सेकंदांमध्ये दोन वेळा मला आवाज आला असल्याचं वक्तव्य तिनं केलं.

त्यानंतर तिने   वॉचमनला देखील घटनेबाबत विचारलं तेव्हा त्याने देखील या घटनेचा आवाज ऐकला होता परंतु आवाज कसला आहे हे त्याला ओळखता आलं नाही. अखेर मी पोलिसांकडे तक्रार केली. मला घाबरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी असे कट रचले जात असल्याचं मत तिने व्यक्त केलं. 

याप्रकरणी सध्या पोलीस चौकशी करत आहेत. सध्या कंगना सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चे आहे.  राजकिय, सामाजिक आणि बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाना साधत तिने सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत.