मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. कॅरेक्टर असो किंवा स्क्रिप्ट, लोक या शोशी मजबूत जोडले गेले आहेत. कलाकारांनी वेळोवेळी शो सोडल्यामुळे आणि स्क्रिप्ट कमकुवत झाल्यामुळे, लोकं आता जुने भाग पाहण्यास प्राधान्य देत आहेत. कारण ते अधिक मजेदार आणि मनोरंजक आहेत.
दिशा वाकानी उर्फ दयाबेन, गुरचरण सिंग उर्फ रोशन सिंग सोढी आणि शैलेश लोढा उर्फ तारक यांच्यासह अनेक कलाकारांनी अलीकडच्या काळात शो सोडला आहे. आता या यादीत राज अनडकट उर्फ टप्पू हे नवीन नाव सामिल झालं आहे.
रिपोर्ट्सनुसार, टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनडकटने या शोला अलविदा केला आहे. जरी क्रू किंवा अभिनेत्याने याबद्दल कोणतंही अधिकृत विधान जारी केलं नसलं तरी, तो बऱ्याच काळापासून शोमध्ये दिसत नसल्याने चाहते खूप संशयास्पद आहेत. भाव्या गांधी टप्पूची भूमिका साकारत होता. 2008 ते 2017 अशी 9 वर्षे त्याने या शोमध्ये टप्पूची भूमिका साकारली पण 2017 नंतर राज अनाडकटने ही भूमिका हाती घेतली.
5 वर्षांनंतर त्याने हा शो देखील सोडला. या भूमिकेसाठी निर्माते कोणाला घेऊन येणार हे येणारा काळच सांगेल. दरम्यान, निर्माते दयाबेनच्या शोधात आहेत. वृत्तानुसार, शोचे निर्माते असित मोदी यांनी पुष्टी केली होती की दिशा वाकानी दयाबेनच्या भूमिकेत परत येणार नाही. परंतु तिची भूमिका परत येणार आहे. असित मोदी म्हणाले की, दिशाच्या जागी ऑडिशन्स सुरू आहेत आणि लवकरच दयाबेनच्या रूपाने एक नवीन अभिनेत्री येणार आहे.