भजन सम्राट अनूप जलोटा आणि जसलीन झळकणार एकत्र

दोघांच्या नात्याचा उलगडा करणारा चित्रपट.

Updated: Oct 18, 2019, 02:17 PM IST
भजन सम्राट अनूप जलोटा आणि जसलीन झळकणार एकत्र title=

मुंबई : गायक आणि 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धक जसलीन मथारू आणि भजन सम्राट अनूप जलोटा आता मोठ्या पडद्यावर भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. बिग बॉसनंतर रूपेरी पडद्यावर ही जोडी पुन्हा कल्ला करणार आहे. 'वो मेरी स्टुडंट है' या चित्रपटाच्या माध्यमातून हे दोघे चाहत्याचे मनोरंजन करणार आहेत. 

या चित्रपटाची कथा अनूप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्या नात्या भोवती फिरताना दिसत आहे. चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याचं वास्तव रूप जगासमोर येणार आहे. या जोडीच्या चर्चा संपूर्ण देशभर पसरल्या होत्या. त्याला कारणंही तसेचं होते, या दोघांमध्ये चक्क ३७ वर्षांचा अंतर होता. 

अनूप जलोटा आणि जसलीन दोघे तिन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शोमधून बाहेर आल्यानंतर जसलीनने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिले. पंजाबी कुटुंबात जन्म घेतलेल्या जसलीनला बालपणापासूनच संगीतामध्ये रस आहे.

त्यामुळे तिच्यावर बालपणापासूनच संगीत कलेचे संस्कार झाले आहेत. तिने अनेक दिग्गज कलाकारांसह स्टेज देखील शेअर केले आहेत. त्याचप्रमाणे तिला महाविद्यालयीन जीवनात सर्वात्कृष्ठ गायक महिला  पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.