अक्षयला भेटण्यासाठी अनुपम खेर यांची 'स्कूटर राईड'

ट्विटरवर अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: Jun 6, 2019, 04:16 PM IST
अक्षयला भेटण्यासाठी अनुपम खेर यांची 'स्कूटर राईड' title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अभिनेते अनुपम खेर सध्या थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. त्यांचे फोटो, व्हिडिओ ते सोशल मीडियावरुन शेअर करत आपल्या चाहत्यांना अपडेट्स देत असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनुपम खेर एका स्कूटरवर बसून त्यांचा मित्र अक्षय कुमारला भेटण्यासाठी त्याच्या हॉटेलवर जात आहेत. अक्षय कुमार त्याच्या आगामी 'सूर्यवंशी'चं शूटिंग थायलंडमध्ये करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी मी माझ्या मित्राला अक्षय कुमारला भेटायला जाण्यासाठी स्कूटर घेतली असून मला या राईडमध्ये मजा येत असल्याचं त्यांनी व्हिडिओत म्हटलंय.

अनुपम खेर आणि अक्षय कुमार यांनी 'स्पेशल २६', 'टॉइलेट: एक प्रेम कथा' आणि 'बेबी' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. सध्या अक्षय कुमार 'सूर्यवंशी' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. या चित्रपटातील अक्षयचे काही स्टंट करतानाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

 

'सूर्यवंशी' चित्रपटातून अक्षय कुमारसह अभिनेत्री कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. अक्षय कुमारसोबत १० वर्षांनंतर कतरिना कैफ प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.