Anupama नंतर वनराज काव्यालाही देणार घटस्फोट?

Anupama मालिकेत आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट, पुन्हा एकदा लग्न मोडणार....

Updated: Dec 3, 2021, 07:11 PM IST
Anupama नंतर वनराज काव्यालाही देणार घटस्फोट?

मुंबई: अनुपमा ही घराघरात पोहोचलेली मालिका आहे. ही मालिका एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन थांबली आहे. या मालिकेत एकीकडे अनुपमा आणि अनुजचं लग्न व्हावं अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे बा आणि बापुजी यांच्या लग्नाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जात आहे. 

या लग्नाच्या वाढदिवशीच मिस्टर शाह म्हणजे वनराज पुन्हा मोठा निर्णय घेणार आहे. या त्याच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबाला आणि काव्याला मोठा धक्का बसला आहे. सध्या याचा एक प्रोमो सोशल मीडिय़ावर फिरत आहे. 

या व्हिडीओमध्ये पुढील भागात वनराज काव्याच्या हातात घटस्फोटाचे पेपर्स ठेवतो असं दाखवण्यात आलं आहे. हा सगळा प्रकार अनुपमा आणि घरातील सदस्य पाहातच राहतात. आधी अनुपमाला घटस्फोट देऊन वनराजने काव्यासोबत संसार थाटला होता. मात्र काव्याचा स्वभाव आणि कटकारस्थान वनराज समोर येतात. 

काव्याच्या या वेगळ्या स्वभावामुळे घरात रोज नवे वाद वाढत असतात. त्यामुळे वनराज आणि अनुपमा पुन्हा एकत्र येतील का अशी भीती काव्याला असते. या दोघांमध्ये सतत वादही होत असतात. काही दिवसांपूर्वी काव्याने घराचे पेपर्स आपल्या नावावर देखील केले होते. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडत होते. 

आता वनराज आपला बदला घेण्यासाठी काव्याला घटस्फोट देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भागात काय घडणार याची उत्सुकता वाढली आहे. पुन्हा अनुपमा आणि वनराज एकत्र येणार का? याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत.