लग्नाआधी बाळाचा विचार करणारी कतरिना पोहोचली क्लीनिकमध्ये

लग्नाच्या चर्चांदरम्यान कतरिना अचानक क्लीनिकमध्ये का पोहोचली... चर्चांना उधाण... पाहा फोटो

Updated: Dec 3, 2021, 06:30 PM IST
लग्नाआधी बाळाचा विचार करणारी कतरिना पोहोचली क्लीनिकमध्ये

मुंबई: कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाची सध्या जगभरात चर्चा आहे. सध्या या दोघांच्या लग्नाची चर्चा जिकडे तिकडे होत असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. लग्नाच्या या चर्चां दरम्यान अचानकच कतरिना कैफ क्लीनिकमध्ये दिसली आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

कतरिना आणि विकीने गुपचूप लग्न केल्याची एकीकडे चर्चा सुरू आहे. मात्र यावर दोघांनीही अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कतरिनाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोमध्ये ती ब्लॅक टॉपमध्ये मास्क लावून जात असल्याचं दिसत आहे. कतरिनाने कोणताही मेकअप देखील केला नाही. 

या व्हायरल फोटोवर युजर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. तर काही युजर्सनी प्रेग्नंट आहे का? असा प्रश्नही विचारला आहे. कतरिना क्लीनिकमध्ये दिसल्याने काही युझर्सनी लग्नाआधीच प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न विचारला आहे. मला वाटत नाही हीच लग्न आहे अजून ही मुंबईत कशी असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने क्लीनिकबाहेरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर तो वेगानं व्हायरल झाला आहे. यावेळी कतरिना काही बोलली देखील नाही. क्लीनिकमधून बाहेर पडताच ती गाडीत बसून निघून गेली.

7 डिसेंबरपासून कतरिनाच्या लग्नाची विधी सुरू होत आहेत. 9 डिसेंबरला विकी आणि कतरिना सप्तपदी घेतील अशी माहिती मिळाली आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. लग्नादरम्यान कोणालाही फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास परवानगी नाही. सर्व पाहुणे 5 डिसेंबरला राजस्थानमध्ये पोहोचतील.