मुंबई : बॉलिवूडला सध्या लगीनघाई लागलीय. एकामागून एक अभिनेता-अभिनेत्री लग्नबंधनात अडकत चालली आहेत. आता आणखी एका लग्नाची चाहूल चाहत्यांना लागलीय.या लग्नाची चर्चा देखील सोशल मीडियावर होत आहे.
बॉलिवूडमध्ये पून्हा एकदा शहनाई वाजणार आहे. कारण 21 वर्ष आलिया ही लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ही आलिया भट्ट यांची नसून कश्यप यांची आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आलियाने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनच्या ओळी पाहून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु झालीय.
रिलेशनशीपला 2 वर्ष पुर्ण
शेन ग्रेगोयर आणि आलिया कश्यप यांच्या नात्याला दोन वर्षे पूर्ण झालीत. आलियाने काही फोटो पोस्ट करत शेनला शुभेच्छा दिल्या. इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या या फोटोंमध्ये दोघेही खूप रोमँटिक दिसत आहेत. त्याचवेळी दोघेही एका फोटोत लिप लॉक करताना दिसले.
दरम्यान छायाचित्रे पोस्ट करताना आलियाने लिहिले की, 'माझ्या आयुष्यातील दोन सर्वोत्कृष्ट वर्ष, माझा जिवलग मित्र आणि सोलमेट सोबत. रिलेशनशीपला दोन वर्ष झाल्याच्या तिने शुभेच्छा दिल्या. तर मी तुझ्यावर सदैव प्रेम करतो' असे ती म्हणते आहे.
शेननेही काही फोटो शेअर करून लिहिले की, 'रिलेशनशिपला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या शुभेच्छा माझी स्वीट एंजेल, जिला मी माझे प्रेम समजतो. तू माझी बेस्ट फ्रेंड, पार्टनर आणि सर्व काही आहेस. मी तूझा खुप आभारी आहे की, प्रत्येक आनंदाचा तो प्रत्येत क्षण तू माझ्या आयुष्यात घेऊन आली आहेस. मला प्रत्येक वेळी समजून घेतल्या बद्दल खुप आभार. मी तूझ्यावर खुप प्रेम करतो. आणि त्या दिवसाची वाट पाहतोय ज्या दिवशी मी तूझ्या हातात अंगठी घालीन, असे तो म्हणालाय.
आलियाने शेनच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, 'माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला या कॅप्शनवर रडायचे आहे.' शेनच्या अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त करताना आलिया खूपच भावूक झाली होती.
शेनने लिहलेल्या या कॅप्शननंतर आलिया आणि शेनच्या लग्नाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आता फक्त प्रतीक्षा आहे की हे जोडपे त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा कधी करतात.मात्र अद्याप दोघांनीही या लग्नाच्या बातम्य़ांना दुजोराही दिला नाही आणि नाकारलं ही नाही आहे.